माजी विश्वस्त ललिता शिंदे यांचा आरोप
नाशिक : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये कोट्यवधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा खळबळजनक आरोप देवस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी केला.
शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हे सनसनाटीत आरोप केले. हा केवळ आर्थिक अपहार नव्हे, तर धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांवर झालेला आघात आहे. त्यामुळे या गंभीर प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी शिंदे यांनी केली. दरम्यान, याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि नाशिक जिल्हा न्यायालयाच्या संबंधित अधिकार्यांकडे निवेदन पाठवून सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
शिंदे यांनी हे संपूर्ण प्रकरण त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या पवित्रतेला आणि आस्थेला धक्का पोहोचवणारे असल्याचे म्हटले. ललिता शिंदे यांनी केलेल्या आरोपांनुसार धर्मदाय सहआयुक्त (नाशिक) व तत्कालीन अध्यक्षांसह विश्वस्तांनी मिळून या नियुक्त्यांसाठी अवैध आर्थिक देवाणघेवाण केल्याचे आरोप केले आहेत. संबंधित न्यायाधीश आर.आर. राठी यांच्यावर 11 एप्रिल 2025 रोजी पदमुक्तीची कारवाई झाली असून, त्यांच्या संदर्भातील चौकशी सुरू आहे. शिंदे यांनी यामध्ये सीडीआर तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि धर्मदाय आयुक्त कार्यालयातील निर्णय प्रक्रियेचा तपशील सार्वजनिक करण्याची मागणी पत्रकार परिषदेत निवेदनाद्वारे केली आहे.
ना. उदय सामंतांची निमात घोषणा नाशिक : प्रतिनिधी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने त्यांच्या नूतन प्रकल्पासाठी…
पळाशी : वार्ताहर नांदगाव तालुक्यातील गिरणा धरणातून चाळीसगाव औद्योगिक वसाहतीची तहान भागविण्यासाठी 1500 क्यूसेक पाण्याचा…
भक्तांनी केला ‘हर हर महादेव’चा गजर पंचवटी : प्रतिनिधी श्रावणातील तिसर्या सोमवारला अधिक महत्त्व असल्याने…
ऑगस्ट हा दिवस जगभर जागतिक हत्ती दिवस म्हणून साजरा केला जातो. जगभरात हत्तींची संख्या झपाट्याने…
मनपा अधिकार्यांना डांबर व सिमेंटची प्रतीकात्मक स्वरूपात भेट नाशिक : प्रतिनिधी शहरातील विविध मुख्य व…
राजीव गांधी भवन येथे भव्य मानवी साखळी; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग नाशिक : प्रतिनिधी भारताच्या स्वातंत्र्याच्या…