नाशिक : प्रतिनिधी
मनसेच्या भोंग्याबाबत आंदोलन इशाऱ्यामुळे मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांना आज सकाळी सातपूर पोलिसांनी पाथर्डी परिसरातून अटक केली आहे. मात्र जिल्हाध्यक्ष अंकुश पवार अद्याप फरार आहे. दातीर हे दोन दिवसांपासून फरार होते. नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला होता .त्यामुळे भोंगाविरोधी अंदोलन मोठ्या प्रमाणात करण्यासाठी मनसैनिक सज्ज होते. मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाकडून मनसे पदाधिकाऱ्यांची धरपकड करण्यात आली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या भोंग्याबाबतच्या अल्टीमेटमनंतर ठिकठिकाणी मनसैनिकांकडून लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र पोलीसांनी वेळीच हस्तक्षेप करत मनसे कार्यकर्त्यांना अटक केली होती.
या दरम्यान शहराध्यक्ष दिलीप दातीर ते फरार झाले होते,आज (दि.७) शनिवार सकाळी सातपूर पोलिसांनी पाथर्डी परिसरातून दातीर यांना अटक केली आहे. मात्र जिल्हाध्यक्ष अंकुश पवार अद्याप फरार आहे.कायदा सुव्यवस्था राहावी यासाठी मनसेच्या 14 जणांना पोलिसांनी तडीपारच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. तसेच आंदोलनादरम्यान शहरात सकाळी मशिदींसमोर लाऊड स्पीकर लावून हनुमान चालीसा म्हणणाऱ्या 29 पदाधिकारी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, यात सहा महिला कार्यकर्त्यांचा सहभाग होता. तसेच 100 हुन अधिक मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नोटीसा देखील बजाविण्यात आल्या होत्या.