नाशिक

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेची निदर्शने

नाशिक : प्रतिनिधी
दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
मनसेच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले की, जंतर-मंतर येथे गेल्या 22 दिवसांपासून हजारो विद्यार्थी शांततापूर्ण आंदोलन करत असताना, प्रशासनाने उपोषणकर्ते सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवले तसेच संसद भवनाकडे निघालेल्या विद्यार्थ्यांच्या मोर्चावर लाठीचार्ज केला. या घटनेचा निषेध करत नाशिकमध्ये आंदोलन करण्यात आले.
प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर टीका करत, विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज हा लोकशाही आणि संविधानाचा अपमान असल्याचे सांगितले. देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणे अयोग्य असून, अशा घटनांमुळे देश हुकूमशाहीकडे जात असल्याची टीका त्यांनी केली.
जिल्हाध्यक्ष अंकुश पवार व शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनीही जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाला मनसेचा ठाम पाठिंबा असल्याचे जाहीर करत लाठीचार्जचा निषेध व्यक्त केला. आंदोलनादरम्यान काही काळ रास्ता रोकोही करण्यात आला.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख, रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, उपजिल्हाध्यक्ष मनोज घोडके, युवा नेते किरण खाडम, विजय रानाते, सत्यम खंडाळे, सचिन सिन्हा, नितीन माळी, कौशल पाटील, विजय पडवळ, गोकुळ नागरे, मिलिंद कांबळे, रामदास जाधव, विशाल भावले, विजय ठाकरे, किरण क्षीरसागर, किरण जाधव, तुषार जगताप, राकेश परदेशी, नितीन पंडित, संतोष कोरडे, प्रफुल बनबेरू, विजया अहिरे, अमोल गोजरे, दीपक मोकळ, अमित गांगुर्डे, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष ललित वाघ, बाजीराव मते, रोहित उगावकर, मेघराज नवले, महिला सेना शहराध्यक्ष अक्षरा घोडके, शैला शिरसाट, शीतल मंडलिक, वैशाली शिंदे, रीना सोनार, मयुरी बैरागी, उदय देशमुख, राहुल घोडे, मयूर पाटील, मयूर जैन, विनायक नारखेडे, धरम गोविंद, दिनेश विश्वकर्मा यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सरकारकडून विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली. लोकशाही प्रधान देशात आता हिटलरशाही सुरू झाली आहे. सरकारला आता ‘चले जाव’ म्हणण्याची वेळ आली आहे. भारतीय लोकशाही टिकवण्यासाठी या सरकारविरुद्ध सर्वांनी एकत्र येण्याची ही वेळ आहे.
– सुदाम कोंबडे, मनसे शहराध्यक्ष

प्रमुख मागण्या
धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा.
लाठीचार्जची निष्पक्ष चौकशी करावी.
अधिकार्‍यांवर कारवाई करावी.
विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.

MNS holds protest outside the District Collector’s office.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

2 days ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

2 days ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 days ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 days ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 days ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

2 days ago