नाशिक

मनसेचे मनपा मुख्यालयात झोपून आंदोलन

नाशिक : प्रतिनिधी
शहरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था, ठिकठिकाणी पडलेले जीवघेणे खड्डे आणि त्यातून होत असलेल्या अपघातांमध्ये निष्पाप नागरिकांचा बळी जात असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवारी नाशिक महानगरपालिका मुख्यालयात झोपून आंदोलन करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच आयुक्त कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनातून मनपा प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच नाशिक जिल्हा संपर्क अध्यक्ष अविनाश जाधव आणि अभिजित पानसे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. शहरातील रस्त्यांची बकाल अवस्था, वाढते खड्डे आणि त्याकडे प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष यामुळे सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप मनसेने केला. यावेळी कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या आढावा बैठकीदरम्यान मनसेच्या पदाधिकार्‍यांनी त्यांना घेराव घालून रस्त्यांच्या प्रश्नावर जाब विचारला. रस्ते तातडीने खड्डेमुक्त न केल्यास महानगरपालिकेच्या कोणत्याही अधिकार्‍याला रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा दिला.
आंदोलनात जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, संदीप भवर, जिल्हा उपाध्यक्ष मनोज घोडके, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष ललित वाघ, शहराध्यक्ष तुषार जगताप, पंचवटी विभाग अध्यक्ष विजय पडोळ, राहुल पाटील, शहर संघटक मेघराज नवले, अमित गांगुर्डे, प्रफुल बनबैरू, किरण क्षीरसागर, विराज आंबेकर, नागेश काठोळे, कुणाल पाटील, मयूर जैन, दीपक येलमामे, गणेश शेजुळ, आतिश कापडणीस, मिरज भालेराव, किसान साळुंखे यांच्यासह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

MNS stages protest by lying down at the municipal corporation headquarters.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

3 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

3 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

3 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

3 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

3 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

3 hours ago