नाशिक

उशिरा मातृत्वामुळे स्तनपानाचे वाढते आव्हान

कुटुंबाच्या आधाराची गरज; आजपासून जागतिक स्तनपान सप्ताह

नाशिक : प्रतिनिधी
सध्याच्या काळात मुलींचे लग्न उशिरा करण्याचा प्रघात पडला आहे. शिक्षण, करिअर करताना लग्न आणि त्यानंतर लगेच बाळाचा विचार केला जात नाही. परिणामी, लग्नाचे वाढते वय आणि त्यानंतर गर्भधारणेला उशीर केल्याने वाढता ताण आणि स्तनपान करताना आत्मविश्वास आणि संयम कमी असल्याचे दिसून येत आहे.
40 वर्षांच्या आसपास मातृत्व स्वीकारणार्‍या महिलांमध्ये स्तनपानाबाबत आत्मविश्वास आणि संयम तुलनेने कमी दिसून येत असल्याचे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नलिनी बागूल सांगतात. अशा वेळी बाळ रडल्यामुळे निर्माण होणारी चिंता, कुटुंबातील ताणतणाव आणि घाईघाईने फॉर्म्युला दूध देण्याची प्रवृत्ती टाळून आईला मानसिक आधार देणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जन्मानंतरच्या पहिल्या एका तासात बाळाला स्तनपान सुरू करणे आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. जन्मानंतर येणारे पहिले पिवळसर दूध (कोलेस्ट्रम) हे बाळासाठी नैसर्गिक लसीप्रमाणे कार्य करते. त्यामुळे बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढते तसेच न्यूमोनिया, अतिसार आणि विविध संसर्गांचा धोका कमी होण्यास
मदत होते.
याशिवाय, बाळाच्या शरीराचे तापमान आणि रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यासही ते उपयुक्त ठरते. आईसाठीही स्तनपानाचे अनेक फायदे आहेत. प्रसूतीनंतर गर्भाशय लवकर आकुंचन पावण्यास मदत होते, रक्तस्त्राव कमी होतो आणि आई-बाळामधील भावनिक नाते अधिक दृढ होते. जन्मानंतर पहिले सहा महिने बाळाला केवळ आईचे दूधच द्यावे. आईच्या दुधात बाळासाठी आवश्यक असलेले सर्व पोषक घटक आणि पुरेसे पाणी असते. त्यामुळे या काळात वरचे पाणी, मध, काढा किंवा इतर कोणतेही अन्न देण्याची आवश्यकता नसते. स्तनपानामुळे शरीराची ठेवण बिघडते हा समज चुकीचा असून, योग्य पद्धतीने स्तनपान केल्यास असा कोणताही दुष्परिणाम होत नाही. उलट आईचे दूध नेहमी उपलब्ध, स्वच्छ आणि बाळासाठी
सर्वोत्तम असल्याने बाळ कमी आजारी पडते. त्यामुळे विशेषतः नोकरदार महिलांनाही त्याचा फायदा होतो. स्तनपानामुळे महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होण्यास मदत होते. कौटुंबिक तणाव, चिंता किंवा भावनिक दडपण यामुळे दूध कमी येऊ शकते. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी आईला विश्रांती, पौष्टिक आहार आणि मानसिक आधार दिल्यास स्तनपान यशस्वी होण्यास मोठी मदत होते.

मातृत्वाचे आरोग्यदायी फायदे मिळावेत यासाठी पहिले अपत्य साधारण 30 वर्षांच्या आत आणि दुसरे अपत्य 35 वर्षांच्या आत होणे अधिक चांगले.
40 वर्षांच्या आसपास प्रथमच मातृत्व स्वीकारणार्‍या महिलांमध्ये स्तनपानाबाबत आत्मविश्वास आणि संयम तुलनेने कमी दिसून येतो. बाळ रडले की अनेक माता चिंतेत येतात आणि नातेवाइकांच्या सल्ल्याने लगेच वरचे दूध सुरू केले जाते. प्रत्यक्षात अशा वेळी आईला धीर देणे आणि योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. – डॉ. नलिनी बागूल, स्त्रीरोगतज्ज्ञ

बाळाला होणारे फायदे

आईच्या दुधावर वाढणार्‍या मुलांची बौद्धिक आणि मानसिक क्षमता अधिक असते. भावी आयुष्यात लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह यापासून संरक्षण मिळते. बाळाच्या वाढीसाठी पोषक घटक मिळतात. बाळाच्या जबड्याचे स्नायू बळकट होतात. बाळाचा जंतुसंसर्ग आणि किरकोळ आजारांपासून संरक्षण होते.

स्तनदा मातांना होणारे फायदे

स्तनपानामुळे मातेचे गर्भाशय पूर्वस्थितीत येण्यास मदत होते.प्रसूतीनंतर होणारा अतिरिक्त रक्तस्त्राव कमी होतो. गर्भारपणात वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. स्तनपान केल्याने बाळ वारंवार आजारी पडत नाही. आई आणि बाळात जिव्हाळ्याचे संबध तयार होतात.

असा असावा मातेचा आहार

रोजच्या आहारात राजगिरा चिक्की, शिरा, नागली शिरा, डिंकाचे, मेथीचे, अळीव खीर आदी पोषणमूल्ययुक्त असलेल्या पदार्थांचा समावेश आवर्जून करावा. जेणेकरून आईच्या दुधाचा दर्जा वाढविण्यासाठी मदत होते.

The growing challenge of breastfeeding due to delayed motherhood.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मोहाडीत मोहाडमल्ल महाराजांची शतकाची रोठ परंपरा

लोकसहभागातून साडेतीन लाखांचा रथ; आज भव्य मिरवणूक दिंडोरी : प्रतिनिधी तालुक्यातील मोहाडी येथील ग्रामदैवत श्री…

14 hours ago

सिंहस्थाच्या नावाने त्र्यंबकेश्वरचे रस्ते गाळात

ओव्हर स्मार्ट नियोजनामुळे नागरिक अन् भाविक हैराण त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर…

14 hours ago

पावसा पावसा… तू पण!

नाशिक शहर आणि सभोवतालच्या परिसरात मागील महिन्याभरात धो..धो.. पाऊस बरसला आहे. नाशिक जिल्ह्यात जुलै महिन्यात…

14 hours ago

अब्दुल्लांचे आंदोलन

कॉक्रोच जनता पार्टीच्या ‘चलो संसद’ आंदोलनात 20 जुलै रोजी प्रचंड हंगामा झाला. विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी…

14 hours ago

जीवघेणे खड्डे !

पाच जणांचा मृत्यू; नागरिकांमध्ये प्रचंड संताप नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्वर्र्भूमीवर शहरात हजारो कोटी…

14 hours ago

खड्डेमुक्तीसाठी मंत्री महाजनांचा सात दिवसांचा अल्टिमेटम

अन्यथा अधिकार्‍यांवर कारवाई, ठेकेदारही रडारवर नाशिक : प्रतिनिधी वर्षभरात सिंहस्थ कुंभमेळा होत असल्याने शहरात रस्ते…

14 hours ago