नाशिक

मान्सून टास्क फोर्सची धडक मोहिम

प्रभाग क्रमांक 5, 8, 12, 14, 18, 25 मध्ये पाहणी

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या मान्सून टास्क फोर्स मोहिमेच्या दुसर्‍या टप्प्याला शहरातील विविध भागांत वेग आला आहे. या विभागांत प्रत्यक्ष क्षेत्रीय पातळीवर धडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
याअंतर्गत पंचवटी, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नाशिकरोड, नवीन नाशिक आणि सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक 5, 8, 12, 14, 18 आणि 25 मध्ये विविध नागरी समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यात येत आहेत.
या विशेष अभियानांतर्गत पावसाळ्यात नागरिकांना अडचणी निर्माण करणार्‍या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. जलनिस्सारणाचा मार्ग मोकळा करणे, पावसाळी गटारांची साफसफाई, ड्रेनेज लाइन स्वच्छता, चेंबरमधील अडथळे दूर करणे, कचरा निर्मूलन, खड्डे बुजविणे आणि अतिक्रमणांवर कारवाई, अशा विविध उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्यात येत आहेत. संबंधित विभागीय अधिकारी आणि त्या-त्या प्रभागातील लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून ही कामे अधिक प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.
पंचवटी विभागातील प्रभाग 5 अंतर्गत पेठरोड परिसरातील नवनाथनगर, गोविंद मामा चौक ते उत्सव सोसायटी या भागातील ड्रेनेज लाइन साफसफाईचे काम हाती घेण्यात आले. काळाराम मंदिर पूर्व दरवाजापासून नाक चौक ते हत्ती पूल परिसरातील चेंबर होल मोकळे करण्याचे काम करण्यात आले, जेणेकरून पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत होईल. दिंडोरीरोड परिसरात तारवाला सिग्नलजवळ पावसाळी चेंबरमध्ये चोकअप निर्माण झाल्याने संबंधित ठिकाणी तातडीने दुरुस्ती व साफसफाईचे काम सुरू करण्यात आले. शिवशक्ती जलकुंभ परिसरात जेसीबीच्या सहाय्याने व्हॉल्व्ह चेंबर परिसरातील बाहेरील खोदाई बुजविण्याचे काम पूर्ण करण्यात आले. पावसाळ्यात पाणीपुरवठा व्यवस्थेवर परिणाम होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या. शहरात स्वच्छता व पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने प्रतिबंधित प्लास्टिक कॅरिबॅग विक्रीसाठी साठा बाळगल्याप्रकरणी एका प्रकरणात पाच हजारांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

मनपा आयुक्तांचे लक्ष

महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, विशेष पथके, तसेच संबंधित प्रभागांतील लोकप्रतिनिधी यांच्या सक्रिय सहभागातून मान्सून टास्क फोर्सची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू आहे. नागरिकांकडून होणार्‍या तक्रारींवर तातडीने कार्यवाही केली जात आहे. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली मान्सून टास्क फोर्सच्या दुसर्‍या टप्प्यात पहिल्या टप्प्यातील यशस्वी कामांना पुढे नेत अधिक गतिमान आणि परिणामकारक पद्धतीने शहरातील पावसाळी व्यवस्थापन सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे.

Monsoon Task Force’s intensive drive

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

16 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

16 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

16 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

16 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

16 hours ago