नाशिक

जुलैची दमदार सुरुवात; पहिल्याच पावसाने दिलासा

24 तासांत 7.7 मिलिमीटर पावसाची नोंद; पुढील दोन दिवस जिल्ह्याला यलो अलर्ट

नाशिक : प्रतिनिधी
पावसाने निराश केलेल्या जूननंतर जुलैची सुरुवात मात्र नाशिककरांसाठी दिलासादायक ठरली. महिन्याच्या पहिल्याच दिवशी शहरात सकाळपासून रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला. दिवसभर पावसाची उघडझाप सुरू राहिल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला.
भारतीय हवामान विभागाच्या नोंदीनुसार, बुधवारी (दि. 1 जुलै) सकाळी 8.30 पर्यंतच्या 24 तासांत शहरात 7.7
मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे शहरातील वातावरण प्रसन्न झाले आहे. गेल्या महिनाभरापासून दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नाशिककरांच्या अपेक्षा पुन्हा उंचावल्या आहेत.
यंदाच्या जूनमध्ये अपेक्षेपेक्षा अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकरी, नागरिक व प्रशासन चिंतेत होते. खरीप हंगामातील पेरण्या, धरणांतील साठा आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन यावर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस होणे आवश्यक मानले जात आहे.
दरम्यान, हवामान विभागाने पुढील दोन दिवस नाशिक जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शहरात दिवसभर ढगाळ वातावरण कायम राहिले आहे. अधूनमधून पडणार्‍या सरींमुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. शेतकर्‍यांनाही या पावसामुळे काही प्रमाणात आशा निर्माण झाली आहे. जुलैमध्ये सातत्याने पाऊस झाल्यास खरीप हंगामाला मोठा
आधार मिळेल.

 

A strong start to July; the very first rain brings relief.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

17 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

17 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

17 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

17 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

17 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

17 hours ago