नाशिक

एरंडगावजवळ क्रेटा कारच्या धडकेत मायलेकीचा मृत्यू

येवला : प्रतिनिधी
येवला-नाशिक महामार्गावरील एरंडगाव शिवारात क्रेटा कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला असून, येवला तालुका पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल
केला आहे.
23 जून रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास एरंडगाव शिवारातील वर्मा लॉन्ससमोर हा अपघात घडला. धुळे येथील प्रवीण शांताराम डुकरे हे आपल्या कुटुंबासह दुचाकीने (एमएच 15 जीडी 6888) येवल्याकडून एरंडगावच्या दिशेने जात होते. याच वेळी नाशिकच्या दिशेने जाणार्‍या क्रेटा कारने (एमएच 15 एचसी 7170) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की, हेमा प्रवीण डुकरे यांचा जागेवरच मृत्यू झाला, तर प्रवीण शांताराम डुकरे, आदेश प्रवीण डुकरे आणि संस्कृती प्रवीण डुकरे (वय 9) हे तिघे गंभीर जखमी झाले.
त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान नऊ वर्षांची संस्कृती डुकरे हिची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी धीरज राजेंद्र पाटील (रा. एरंडगाव, ता. येवला) यांनी दिलेल्या तक्रारीवरून येवला तालुका पोलीस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर फरार झालेल्या कारचालकाचा पोलीस शोध घेत असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहीर करत आहेत.

Mother and daughter killed after being hit by a Creta car near Erandgaon.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

14 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

14 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

14 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

14 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

14 hours ago