नाशिक

वावी वेस परिसर अंधारात; स्ट्रीट लाइट बंद, उघड्या गटारात महिला पडून गंभीर जखमी

सिन्नर : प्रतिनिधी

शहरातील वावी वेस परिसरात नागरी सुविधांचा बोजवारा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत असून, स्ट्रीट लाइट बंद पडल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून परिसरातील 8 पैकी केवळ 3 स्ट्रीट लाइट सुरू होत्या. मात्र, आज त्यादेखील पूर्णपणे बंद झाल्याने संपूर्ण परिसर अंधाराच्या विळख्यात सापडला आहे. वावी वेस भागातून जाणार्‍या मुख्य रस्त्यावर दिवसरात्र भरधाव वेगाने वाहने धावत असतात. अशा परिस्थितीत रस्ता ओलांडताना नागरिकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांना अंधारामुळे जीव धोक्यात घालून रस्ता पार करावा लागत आहे. दरम्यान, अग्निशामक केंद्रासमोरील गटारावर झाकण (ढापा) नसल्यामुळे नुकतीच एक महिला त्या गटारात पडून गंभीर जखमी झाली. अंधारामुळे गटाराचा अंदाज न आल्याने हा अपघात घडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच परिसरात आणखी एक गंभीर समस्या म्हणजे कचर्‍याचा मोठा ढिगारा. अग्निशामक इमारतीजवळ मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून, दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, नगरपालिकेचे कर्मचारी नियमितपणे कचरा उचलण्यासाठी येत नसल्याने परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप केला आहे. बंद स्ट्रीट लाईट तातडीने सुरू करणे, उघड्या गटारावर सुरक्षित झाकण बसविणे आणि परिसरातील कचरा त्वरित हटविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Wavi Ves area plunged into darkness; streetlights off, woman seriously injured after falling into an open drain.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

15 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

15 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

15 hours ago