काही दिवसांपूर्वी एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत बोलावलेल्या बैठकीत एका मुख्याध्यापकाने अशी तक्रार केली की,मूलं कधीच त्यांच्या आईला पालक सभेत शाळेत आणत नाही किंवा त्याची आई कधीही पालक सभेत येत नाही.इयत्ता पाचवीच्या त्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर वर्ग शिक्षकांनी त्यांना कशी आई आवडते यावर निबंध लिहायला दिला.प्रत्येकाने आपल्या आईचे कौतुक करणारे वर्णन लिहिले.
राहुलच्या मजकुरात त्याने शिर्षक लिहीले .ऑफलाइन मध्ये
(जेव्हा मोबाइल वापरत नाही).मला आई पण ऑफलाईन पाहिजे आहे.मला एक अशिक्षित आई हवी आहे जिला मोबाईल कसा वापरायचा हे माहित नाही पण माझ्याबरोबर ती माझ्याबरोबर सर्वत्र जाण्यासाठी ऊत्सुक असेल.मला जीन्स आणि टी-शर्ट घातलेली आई नको तर छोटूच्या आईसारखी साडी नेसलेली आई हवी आहे. मी जिच्या मांडीवर डोके ठेवून बाळाप्रमाणे झोपू शकतो अशी आई पाहिजे .मला आई पण ऑफलाइन हवी आहे जिला माझ्यासाठी आणि बाबांसाठी मोबाईल पेक्षा जास्त वेळ आहे,ऑफलाईन आई असेल तर बाबांशी भांडण होणार नाही.जेव्हा मी संध्याकाळी झोपायला जाईन तेव्हा व्हिडिओ गेम खेळण्याऐवजी ती मला एक गोष्ट सांगेल.आई तु ऑनलाइन पिझ्झा मागवु नको, तु घरी काहीही बनव मी आणि बाबा आनंदाने खाऊ.मला फक्त ऑफलाइन आई पाहिजे आहे.इतकं वाचून मॉनिटरचा हुंदका संपूर्ण वर्गात ऐकू आला. प्रत्येक विद्यार्थ्याच्या डोळ्यातुन आसव वाहत होती.वर्ग शिक्षकेंच्या डोळ्यातुन अश्रू वहात होते.आजच्या जगात मोबाईलवर खूप प्रेम करणार्या मातांची ही घटना आहे. आयांनो आधुनिक रहा पण आपल्या मुलाचे बालपण जपा, ते परत कधीच येणार नाही.
ऑफलाइन आई
One thought on “ऑफलाइन आई”
-
Pingback: उन्हाळा स्पेशल कोकोनट शेक - Gavkari News