सटाणा : प्रतिनिधी
शहरातील ताहाराबाद नाक्यावरील हॉटेल शिव कृपा जवळून मोटार सायकल व सफेद रंगाचा 80 किलो वजनाचे डुकरच चोरुन नेल्याची घटना सटाण्यात घडली. पोलिसांनी तातडीने चक्रे फिरवल्यामुळे दोन जणांना डुकर व दुचाकीसह ताब्यात घेतले.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रामा शंकर पवार (वय 39) रा. काळू नानाजी नगर पवार हे बांधकाम व डुकर पालनाचा व्यवसाय करतात ताहाराबाद रोडवरील हॉटेल शिवकृपा येथे चहा प्यायला गेले असता त्यांच्या मालकीची मोटार सायकल हीरो होंडा कंपनीची स्पेलंडर प्लस क्रमांक एम.एच .19 ए.बी .5173 लॉक करून हॉटेलसमोरील मोकळ्या जागेवर उभी होती. अज्ञात चोरट्यांनी मोटार सायकल चोरुन नेली.त्यानंतर रामा पवार यांच्याच मालकीचे सफेद रंगाचा 80 किलो वजनाचे डुकर शहरातील मोकळ्या जागेवर पालापाचोळा खात असताना मोटार सायकल व डुकर चोरून धूम ठोकली.याबाबत रामा पवार यांनी सटाणा पोलिस ठाण्यात धाव घेत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला.याची दखल घेत सटाणा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता मोटर सायकल व डुकरघेऊन देवळा शहराकडे जात असतांनाच विशाल विष्णू पवार रा.देवळा व अजय वल्लभ गुंजाळ राहणार पोखरी ता.नांदगाव यांना दोघांना अटक केली. त्यांच्याकडून मोटार सायकल व 80 किलो वजनाचे डुकर हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी सटाणा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष अनमुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाळासाहेब निरभवणे,प्रकाश शिंदे,अजय महाजन विजय वाघ तपास करीत आहेत.