महाराष्ट्र

‘मफलर मॅन’ वादाने तापले राजकारण!

♦ लाड यांचे शरद पवारांना पत्र

♦ सुप्रिया सुळे यांची संयमी भूमिका

♦ शहा, फडणवीसांवर राऊतांचा हल्लाबोल

मुंबई/पुणे : प्रतिनिधी
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासावरून आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या ‘मफलर मॅन’च्या मुद्द्याने राज्याचे राजकारण तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील आरोपांबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी थेट शरद पवारांकडे केली आहे. दुसरीकडे, अजितदादांच्या मृत्यूचे सत्य समोर यावे, मात्र या विषयाचे राजकारण होऊ नये, अशी संयमी भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली. तर संजय राऊत यांनी स्वतंत्र एफआयआर दाखल न झाल्याचा मुद्दा उपस्थित करीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

अजित पवार यांच्या अपघाताच्या तपासासंदर्भात रोहित पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन विमान चालवणार्‍या व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीचे मालक व्ही. के. सिंह यांना मुख्यमंत्री फडणवीस वाचवत असल्याचा आरोप केला. ‘मफलर मॅन’ असा उल्लेख करीत त्यांनी फडणवीस यांचा एका लग्नसमारंभातील मफलर घातलेला फोटो दाखवला. फडणवीस यांचे व्हीएसआरच्या मालकाच्या कुटुंबाशी जवळचे संबंध असल्याचा दावाही त्यांनी केला. मात्र, फोटो दाखवला म्हणजे घातपाताचा आरोप होत नाही. कंपनीच्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय आपण व्यक्त करीत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच तपास सीआयडीकडून सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी केली.
या पार्श्वभूमीवर भाजपचे विधान परिषद सदस्य प्रसाद लाड यांनी मंगळवारी शरद पवार यांना पत्र लिहून रोहित पवार यांचे आरोप पक्षाची अधिकृत भूमिका आहे की वैयक्तिक मत, हे स्पष्ट करण्याची मागणी केली. शरद पवार आणि पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद, निवेदन किंवा समाजमाध्यमांद्वारे भूमिका जाहीर करावी. आरोप मान्य नसतील तर त्यांचे खंडन करावे, अन्यथा रोहित पवारांना पक्षाचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट करावे, असे लाड यांनी म्हटले आहे. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनीही फडणवीस यांची बाजू मांडली. व्हीएसआर कंपनी 2013 पासून सरकार आणि अनेक नेत्यांना विमानसेवा पुरवत असल्याने केवळ फोटोवरून गैरप्रकार सिद्ध होत नाही, असे ते म्हणाले. अपघातावेळी जवळच्या साखर कारखान्याच्या धुरामुळे दृश्यमानता कमी झाली होती का, याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
या वादावर सुप्रिया सुळे यांनी संयमी भूमिका घेतली. रोहित पवार यांची संपूर्ण पत्रकार परिषद आपण पाहू शकलो नाही. कारण त्यावेळी दिल्लीला जाणार्‍या विमानात होतो, असे त्यांनी पुण्यात सांगितले. रोहित आणि अजितदादांचे प्रेमाचे नाते होते. त्यामुळे त्याच्या मनात अस्वस्थता आणि अनेक प्रश्न असणे स्वाभाविक आहे. त्याच्या भावनांचा सन्मान केला पाहिजे. मात्र, अपघाताचे सत्य समोर येणे हीच कुटुंबाची आणि जनतेची अपेक्षा असल्याचे त्या म्हणाल्या.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः अमित शाह यांच्याकडे पारदर्शक आणि वेळेत चौकशीची जाहीर मागणी केली असून हा विषय नागरी उड्डाण मंत्रालयाच्या अखत्यारीत असल्याने केंद्राकडूनच माहिती मिळेल, असेही सुळे यांनी स्पष्ट केले.

सीसीटीव्ही फुटेजचा मुद्दाही ऐरणीवर
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील वकील आणि माहिती अधिकार कार्यकर्ते अ‍ॅड. नितीन संजय यादव यांनी माहिती अधिकारांतर्गत 28 जानेवारी रोजी सकाळी 6 ते 9 या वेळेतील मुंबई विमानतळावरील तसेच देवगिरी बंगला ते विमानतळ या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज मागितले होते. मात्र, संबंधित यंत्रणांनी ते देण्यास नकार दिल्याचे ते म्हणाले. सध्या या प्रकरणाचा तपास सीआयडी, विमान अपघात तपास ब्युरो (एएआयबी) आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (डीजीसीए) सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

‘Muffler Man’ controversy heats up politics!

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला दुचाकींच्या धडकेत दोघांचा मृत्यू

सिडको : प्रतिनिधी सातपूर औद्योगिक वसाहतीत मंगळवारी (दि. 17) दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन…

3 minutes ago

आता दिंडोरी तालुकाही दुष्काळग्रस्त!

नाशिक वगळता सर्व तालुक्यांचा समावेश, मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय मुंबई : प्रतिनिधी नाशिक जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या…

5 minutes ago

प्रिन्सने चालवलेल्या महिंद्रा ‘उडो’ला अर्थशॉट पुरस्कार

मुंबई : विशेष प्रतिनिधी ब्रिटनचे भावी राजे, त्यांच्या मागे बसलेल्या राजकन्या आणि दिमतीला चक्क भारतीय…

11 minutes ago

चहाच्या पिशव्यांमधून सूक्ष्म प्लास्टिकचे कण!

- डॉ. किशोर पवार उकळत्या पाण्यात केवळ तीन मिनिटे ठेवलेल्या चहाच्या पिशवीतून (टी बॅग) सुमारे…

20 hours ago

ताम्रपटातील प्राचीन नाशिक

- रमेश पडवळ - चेतन राजापूरकर नाशिकचा प्राचीन इतिहास केवळ मंदिरे, लेणी आणि शिलालेखांपुरता मर्यादित…

20 hours ago

महागाईचे विष!

- सीमाताई मराठे अर्थशास्त्र हे केवळ आकड्यांचे खेळ नसते, तर ते सामान्य माणसाच्या ताटातील भाकरीचे…

20 hours ago