महाराष्ट्र

अमित शहा यांच्या हस्ते पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण

‘दादा, तुमचे स्वप्न पूर्ण करू’ म्हणत सुनेत्रा पवार गहिवरल्या

पुणे : प्रतिनिधी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दोन दिवसीय पुणे दौर्‍याचा दुसरा दिवस भावुक आणि राजकीय अशा दोन्ही अर्थांनी गाजला. पुणे जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण भवन परिसरात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आणि जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराचे ‘लोकनेते अजित पवार प्रवेशद्वार’ असे नामकरण अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे, पार्थ पवार, जय पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते. शहा यांच्या आगमनानंतर पार्थ आणि जय पवार यांनी त्यांचे स्वागत केले.
अमित शहा यांनी यावेळी अजित पवार यांच्या स्पष्टवक्तेपणाचे आणि वक्तशीरपणाचे कौतुक केले. जे पटलं ते होय, जे नाही पटले ते नाही, असे परखडपणे बोलणारे दादा होते. महायुतीतील जागावाटपाच्या चर्चेतही ते आपलं मत स्पष्ट मांडायचे, असे शहा म्हणाले. अजित पवार यांनी एनडीएमध्ये येण्याचा निर्णय घेतला तेव्हा आपल्यालाही आश्चर्य वाटले होते, असेही ते म्हणाले. कोविड काळात मुख्यमंत्र्यांशी संपर्क होत नसे, तेव्हा अजितदादा कसे काम करायचे, याचा किस्सा सांगत त्यांनी नाव न घेता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला. अजित पवारांचे मला आलेले सर्व फोन फक्त पुणे, बारामती, पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठीच होते. ‘मी तुमच्यासोबत नसलो तरी या भागावर अन्याय होऊ देऊ नका,’ असे ते आग्रहाने सांगायचे, अशी आठवणही शहा यांनी सांगितली. 28 जानेवारीच्या सकाळी फडणवीस यांचा फोन आला तेव्हा मन हादरले, असेही ते म्हणाले.
बॅनरबाजीत शिंदेंनी भाजपला मागे टाकले!
दुसरीकडे, शहा यांच्या स्वागतासाठी पुण्यात झालेल्या बॅनरबाजीनेही सर्वांचे लक्ष वेधले. कार्यक्रम स्थळाबाहेर शिंदेंच्या बॅनरबाजीचीच चर्चा होती. पुणे विमानतळ ते सेनापती बापट रोडवरील जे. डब्ल्यू. मॅरियट हॉटेलपर्यंतच्या संपूर्ण मार्गावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मोठमोठे बॅनर लावण्यात आले. हॉटेलबाहेर शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांचा भव्य बॅनर होता, त्यावर शहा, शिंदे, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, पंतप्रधान मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि सुनेत्रा पवार यांचे फोटो होते. भारताचे यशस्वी गृह व सहकार मंत्री अमित शहा यांचे पुण्यनगरीत हार्दिक स्वागत असा संदेश या बॅनरवर होता.
भाजपकडून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही बॅनर लावले होते, पण शिंदे गटाचे बॅनर संख्येने आणि आकाराने जास्त लक्षवेधी ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. फडणवीस-शिंदे यांच्यातील कथित शीतयुद्धाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंनी शहा यांच्याशी जवळीक दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे विश्लेषणही केले जात आहे. मात्र नंतर पुणे महापालिकेने अनधिकृत बॅनरवर कारवाई करत काही बॅनर काढल्याचेही वृत्त आहे. एकाच दौर्‍यात एकीकडे भावूक श्रद्धांजली आणि दुसरीकडे महायुतीतील शक्तिप्रदर्शन, असे दुहेरी चित्र पुण्यात पाहायला मिळाले.

सुनेत्रा पवार भावुक, ‘खचणार नाही’
भाषणावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा कंठ दाटून आला. आजचा क्षण माझ्यासाठी अत्यंत भावुक आहे. ज्या पुणे जिल्हा परिषदेवर दादांनी जीवापाड प्रेम केले, ज्या जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी आयुष्य वेचले, त्याच जिल्हा परिषदेत त्यांचा पुतळा उभारला गेला, हेच त्यांच्या कर्तृत्वाचे प्रमाणपत्र आहे, असे त्या म्हणाल्या. मी एका संघर्षयोद्ध्याची सहचारिणी आहे. दुःखाने खचून न बसता दादांच्या अपूर्ण स्वप्नांची जबाबदारी घेऊन उभी आहे. दादा, तुमचा प्रवास अर्धवट राहिला असेल, पण तुमच्या स्वप्नांचा प्रवास आम्ही पूर्ण करू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी व्यासपीठावरील अनेक नेतेही भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. या कार्यक्रमात अजित पवार यांच्या जीवनावर आधारित कॉफी टेबल बुकचे प्रकाशन आणि लघुपटाचे प्रदर्शनही झाले.

 

Statue of Ajitdada unveiled in Pune by Amit Shah

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

चहाच्या पिशव्यांमधून सूक्ष्म प्लास्टिकचे कण!

- डॉ. किशोर पवार उकळत्या पाण्यात केवळ तीन मिनिटे ठेवलेल्या चहाच्या पिशवीतून (टी बॅग) सुमारे…

9 hours ago

ताम्रपटातील प्राचीन नाशिक

- रमेश पडवळ - चेतन राजापूरकर नाशिकचा प्राचीन इतिहास केवळ मंदिरे, लेणी आणि शिलालेखांपुरता मर्यादित…

9 hours ago

महागाईचे विष!

- सीमाताई मराठे अर्थशास्त्र हे केवळ आकड्यांचे खेळ नसते, तर ते सामान्य माणसाच्या ताटातील भाकरीचे…

10 hours ago

सोनिया गांधींचे पुस्तक यशस्वी

- राजेश शिरभाते काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्ष, खासदार, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पत्नी, इंदिरा…

10 hours ago

दिवाळी संपली; पुढे काय?

- अशोक थोरात दुष्काळ, जीवघेणी महागाई यात दिवाळी तर संपली, पण पुढील सहा महिने सर्वांनाच…

10 hours ago

विद्यार्थी : समाजाच्या उज्ज्वल भविष्याचे शिल्पकार

विद्यार्थी हा कोणत्याही राष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि बौद्धिक विकासाचा महत्त्वपूर्ण आधार असतो. राष्ट्राचे भविष्य…

10 hours ago