नाशिक

मुंबई- आग्रा महामार्ग संतप्त शेतकर्‍यांनी रोखला Mumbai-Agra highway blocked by angry farmers

मनमाड- इंदूर रेल्वेसाठी जमीन अधिग्रहणाला विरोध

मालेगाव : प्रतिनिधी
न्यू मनमाड- इंदूर रेल्वेलाइन प्रकल्पासाठी सुरू असलेल्या जमीन अधिग्रहण प्रक्रियेतील अन्यायकारक मोबदला व विविध प्रलंबित मागण्यांच्या विरोधात सोमवारी (दि. 15) सकाळी दहाला मालेगाव तालुक्यातील चाळीसगाव फाटा येथे शेतकरी व बाधित नागरिकांनी मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे तीन तास सुरू असलेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. आंदोलनाचे नेतृत्व शेखर पगार यांनी केले.
या आंदोलनात झोडगे, देवारपाडे, चिखलओहोळ, मालनगाव, संवदगाव, सायनेे बुद्रुक, येसगाव, ज्वार्डी, मेहुणे, वराने, घोडेगाव, काळेवाडी, जळगाव चोंडी आदी गावांतील शेतकरी, भूमीधारक व बाधित नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सकाळपासूनच आंदोलकांनी महामार्गावर ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी केली. ‘कोण म्हणतं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही’, ‘जमीन आमच्या हक्काची, कुणाच्या नाही बापाची’, ‘शेतकरी एकजुटीचा विजय असो’, ‘शेतकर्‍यांना न्याय मिळालाच पाहिजे’, ‘जय जवान जय किसान,’ अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.
न्यू मनमाड-इंदूर रेल्वेलाइन प्रकल्पासाठी शेतकर्‍यांच्या सुपीक जमिनी अधिग्रहीत केल्या जात असताना भूसंपादन व जमीन मोजणी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात त्रुटी झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला. अनेक शेतकर्‍यांच्या जमिनी कमी क्षेत्रफळाने नोंदविण्यात आल्याने त्यांना मिळणार्‍या मोबदल्यावर परिणाम होत असल्याचे आंदोलकांनी सांगितले. अनेक ठिकाणी घरे, चाळी, पोल्ट्री व्यवसाय, गोठे व फळबागाबाधित झाल्या असतानाही त्यांचा स्वतंत्र मोबदला देण्यात आलेला नाही, अशी संतप्त भावना व्यक्त केली.
या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता तहसीलदार विशाल सोनवणे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांचे निवेदन स्वीकारले व संबंधित मागण्या वरिष्ठ स्तरावर मांडण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर काही काळाने आंदोलन मागे घेण्यात आले.
या आंदोलनामुळे चाळीसगाव फाटा परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. वरिष्ठ पोलीस व महसूल अधिकार्‍यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवले.

आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या

न्यू मनमाड-इंदूर रेल्वेलाइन भूसंपादन व जमीन मोजणीतील सर्व त्रुटी तत्काळ दूर कराव्यात. बाधित शेतकर्‍यांना प्रतिहेक्टर एक कोटी 60 लाखांंचा न्याय्य मोबदला द्यावा. प्रत्येक बाधित कुटुंबातील किमान एका व्यक्तीस शासकीय नोकरी द्यावी. घर, चाळ, पोल्ट्री, गोठा किंवा फळबागबाधित झाल्यास त्याचा स्वतंत्र व योग्य मोबदला देण्यात यावा.

Mumbai-Agra highway blocked by angry farmers


 
Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

8 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

8 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

8 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

8 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

8 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

9 hours ago