मुंबई: विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आज उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. त्यात माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा पत्ता पुन्हा कट केला आहे.
विधानपरिषद निवडणुकीच्या उमेदवारीसाठी इच्छूक असलेल्या पंकजा मुंडे यांना भाजपने मोठा धक्का दिला आहे. भाजपकडून बुधवारी विधानपरिषद निवडणुकीसाठीच्या पाच उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र मुंडेंना पुन्हा डावलण्यात आले.
विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आपले पाच उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड यांना पुन्हा संधी देण्यात आली असून नव्या तीन नावांचा समावेश करण्यात आला आहे. राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांना भाजपकडून विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे.