हातगाडी सोडविण्यासाठी केली मागणी
नाशिक : प्रतिनिधी
अतिक्रमण विभागाने उचलून नेलेली स्नॅक्सची हातगाडी सोडविण्याच्या मोबदल्यात सात हजारांची लाच स्वीकारणार्या नाशिक महापालिकेतील राष्ट्रीय फेरीवाला धोरण विभागातील कनिष्ठ लिपिकाला सात हजाराची लाच घेताना लाचलुतपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडत कारवाई केली. राजेंद्र पांडुरंग भोरकडे (वय 52) असे संशयिताचे नाव आहे.
दरम्यान, महापालिकेतच कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती अशी की, तकारदार यांचा भाऊ दिव्यांग असून, त्यांची स्नॅक्सची हातगाडी अतिक्रमण विभागाने उचलून नेली. ही हातगाडी सोडावी.याकरिता तक्रारदाराने महापालिकेतील अतिक्रमन विभागात जावून स्नॅक्सची हातगाडी सोडुन देण्याची मागणी केली. यासह तक्रारदाराच्या भावाची गाडी जो दिव्यांग आहे. त्याची गाडी अमृतधाम येथील हॉकर झोन मध्ये बसवुन देण्याची विनंती केली होती. मात्र यामोबदल्यात संशयित राजेद्र बोरकडे याने तक्रारदार यांना 18 हजार रूपये दंडाची रक्कम सांगितली. तसेच दंड न भरता नऊ हजाराची मागणी केली. त्यात तडजोड करुन सात हजाराची रक्कमेची मागणी करून ती गुरुवारी स्किारण्याचे निश्चित केले गेले. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार गुरुवारी राजीव महानगर पालिका मुख्यालयातील फेरीवाला कार्यालया बाहेरील पुरुषांचे प्रसाधन गृहाजावळ तक्रारदाराकडून सात हजाराची लाच स्विकारत असताना भोरकडेला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. पोलीस निरीक्षक नेहा सुर्यवंशी, पो. हवा विनोद चौधरी, अनिल गांगोडे यांनी केले.
महापालिकेतील दुसरी कारवाई- यापूर्वी नाशिक महापालिकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मनपा शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना लाच घेताना रंगेहाथ पकडत कारवाई केली होती. त्यानंतर पुन्हा राजेद्र बोरकडे यास लाच घेताना रंगेहाथ पकडत कारवाई केली गेली. दरम्यान या घटनेनंतर धनगर यांच्या कारवाईच्या घटनेची पालिकेत पुन्हा चर्चा झाली.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…