मनपा अभियांत्रिकी भरती : 58 उमेदवार अपात्र ठरवले

बँक स्टेटमेंटचे कारण, न्यायालयात जाण्याचा इशारा

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेने अभियांत्रिकी संवर्गातील 110 पदांसाथी लेखी परीक्षा घेतली होती. एप्रिलमध्ये या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. प्रशासनाने पात्र 110 व प्रतीक्षा यादीतील 163 उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली. यातील पात्र 110 पैकी तब्बल 58 उमेदवारांना प्रशासनाने अपात्र केल्याने उमेदवारांत खळबळ उडाली आहे. खासगी ठिकाणी काम करत असलेल्या संस्थेतील वेतनाचे बँक स्टेटमेंट सादर न केल्याचे कारण देत हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, हा निर्णय अन्यायकारक असल्याची उद्विग्न भावना या उमेदवारांनी व्यक्त करत येथे न्याय नाही मिळाला तर अम्हाला न्यायालयात जावे लागेल, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
शुक्रवारी प्रशासनाने अपात्र उमेदवारांची यादी तयार करत त्यांना 15 जूनपर्यंतची मुदत दिली आहे. सोमवारी नाशिक महापालिकेत अपात्र ठरवलेल्या उमेदवारांसह त्यांच्या नातेवाइकांनी गर्दी केली होती. यावेळी त्यांनी मनपा आयुक्त मनीषा खत्री यांची भेट घेतली असता, आयुक्तांनी या उमेदवारांना आधीच्या ठिकाणी काम करत असताना बँक स्टेंटमेंट सादर करावे लागेल, असे सांगितले.
दरम्यान, ज्यावेळी जाहिरात प्रसिद्ध झाली, त्यात प्रशासनाने खासगी संस्थेतील तीन वषार्ंचा अनुभव असावा असे म्हटले आहे.
तथापि, काम करत असलेल्या ठिकाणी मिळणार्‍या वेतनाचे बँक स्टेटमेंट व पीएफसंदर्भात माहिती मागितली नव्हती. मग आताच अशाप्रकारे प्रशासनाकडून कशी माहिती मागवली जाते. असा सवाल केला जात आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अग्निशमन व अभियांत्रिकी भरतीकरिता राज्य शासनाने आस्थापनाची अट हटवत भरतीला हिरवा कंदील दिला. त्यानुसार अभियांत्रिकी 110 व अग्निशमन 186 पदांकरिता टीसीएसमार्फत परीक्षा घेण्यात आली.
अग्निशमन लेखी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवाराचे कागदपत्र तपासणी करण्यात आले. कागदपत्र तपासल्यानंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांनी ते आधीच्या ठिकाणी जेथे काम करत होते, त्या संस्थेकडून किंवा कंपनीकडून जे वेतन दिले जात होते, त्याचे बँक स्टेटमेंट व इतर कागदोपत्री माहिती मागवण्यात आली. परंतु यातील तब्बल 58 उमेदवारांकडे या प्रकारचे बँक स्टेटमेंट व पीएफ संदर्भातली माहिती कागदपत्रे सादर करू शकले नाहीत. परिणामी प्रशासनाने त्यांना अपात्र ठरवले. मात्र, प्रशासनाच्या या निर्णयाने या उमेदवारांना मोठा धक्का बसल्याचे दिसून आले. सोमवारी हे उमेदवार सकाळपासून पालिकेत होते, पण त्यांना कुठलाही दिलासा मिळाला नाही.

हा तर आमच्यावर अन्याय
जाहिरात प्रसिद्ध केली त्यात कुठेही असे म्हटले नव्हते की, उमेदवारांना खासगी संस्थेत काम करत असलेल्या ठिकाणी तेथील वेतनाचे बँक स्टेंटमेंट, पीएफसंदर्भातली माहिती सादर करावी लागेल. मात्र, आता अशा प्रकारची अट घालून आमच्यावर अन्याय केला जात आहे. याप्रकरणी आम्हाला न्याय मिळाला नाहीतर न्यायालयात जाऊ. – एक उमेदवार

Municipal Corporation Engineering Recruitment: 58 candidates disqualified

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *