नाशिक

महापालिकेला एक लाख वृक्ष लागवडीचे टार्गेट

प्रधान सचिवांची ऑनलाइन आढावा बैठकीत सूचना

नाशिक : प्रतिनिधी
शहरात पन्नास लाखांची वनसंपदा असल्याचे सहा वर्षांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले होते. मात्र, गेल्या काही वर्षांत सिमेंटच्या जंगलामुळे शहरातील वृक्षसंपदा दिवसेंदिवस कमी होत आहे. दरम्यान, राज्य शासनाने राज्यातील प्रमुख महापालिका क्षेत्रांतील झाडांंची संख्या कमी होत असल्याचे पाहून वृक्षसंवर्धनासाठी स्वत: पुढाकार घेतला आहे. नाशिक महापालिकेला पावसाळ्यात एक लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट (टार्गेट) दिले आहे.
शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, वृक्षप्रेमी यांच्या मदतीने एक लाख रोपांची लागवड केली जाणार आहे.
राज्याचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत ऑनलाइन बैठक घेतली. गतवर्षी महापालिकेच्या उद्यान विभागाने शहरात 85 हजार रोपांची लागवड केली. परंतु चार महिन्यांच्या कालावधीत विविध प्रजातींच्या रोपांची लागवड केली जाणार आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाकडे सध्या रोपे नसल्याने वन विभागाकडून रोपे विकत घ्यावी लागणार आहेत. रोपांची गुणवत्ता पाहून प्रतिरोप वीस ते तीस रुपये याप्रमाणे विकत घ्यावे लागणार आहे.
दरम्यान, नाशिकची ओळख गुलशनाबाद अशी होती. येथील फुलांसह वृक्षसंपदेने शहर बहरलेले असल्याने शहरातील वातावरण आल्हाददायक होते. परंतु गेल्या दहा ते पंधरा वर्षांत वृक्षसंपदा कमालीची घटल्याचा दावा वृक्षप्रेमींकडून केला जात आहे. सिमेंटच्या जंगलासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाला हाताशी धरून सर्रास वृक्षतोड केली जाते, असा आरोप महापालिकेवर होत आहे.
प्रधान सचिवांनी सूचना केल्यानंतर उद्यान विभागाने वृक्षलागवडीचे नियोजन सुरू केले आहे. नाशिकरोड, पंचवटी, सातपूर, नवीन नाशिक, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम या सहा विभागांत प्रत्येकी पंधरा ते सतरा हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असेल.

शहरातील सहाही विभागांत एक लाख रोपांची लागवड उद्यान विभागाकडून केली जाणार आहे. त्याद़ृष्टीने तयारी सुरू केली आहे. आमच्याकडे रोपे नसल्याने वन विभागाकडून ती विकत घेतली जाणार आहेत. कडुलिंब, चिंच, वड, पिंपळ, उंबर आदींसह देशी प्रजातीच्या रोपांची लागवड करण्यात येणार आहे.
– विवेक भदाणे, उद्यान अधीक्षक, मनपा

 

Gavkari Admin

Recent Posts

जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल जालन्याच्या जिल्हाधिकारी,

नाशिक:प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची, जालना येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात…

13 hours ago

भिकाऱ्याकडे साडेसात कोटींची संपत्ती!

भिकाऱ्याकडे साडेसात कोटींची संपत्ती! मुंबईत दोन मोठे फ्लॅट, ठाण्यात दुकानांसह बरंच काही शहापूर  : साजिद…

19 hours ago

विवाह हा संस्कार

भारतीय परंपरेतील प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा संस्कार आहे विवाह. हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे वळणच…

19 hours ago

श्रावण सफल व्हावा…

श्रावणमास सुरू होतो तसे निसर्गात आल्हाददायक बदल घडू लागतात. आभाळात पांढर्‍याशुभ्र पिंजलेल्या कापसाची नक्षी उमटू…

19 hours ago

एसी लोकलमध्ये प्रवाशाचा चक्क छत्री उघडून प्रवास

एसी लोकलमध्ये प्रवाशाचा चक्क छत्री उघडून प्रवास शहापूर : साजिद शेख लोकल ही मुंबईतल्या प्रवाशांची…

2 days ago

सर्प विज्ञानाची गरज

ह्मलोकेषु ये सर्पा शेषनाग परोगमा:। नमोस्तुतेभ्य: सर्पेभ्य: सुप्रीतो मम सर्वदा॥ ब्रह्मलोकामधील सर्व सर्पांचा राजा नागदेव…

2 days ago