नाशिक

महापालिका रणधुमाळी; अर्ज भरण्यास आजपासून सुरवात

शहरात प्रशासनाकडून 10 ठिकाणी व्यवस्था

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिका निवडणुकीसाठी आज, मंगळवार (दि.23)पासून उमेदवारी अर्जांची विक्री व अर्ज स्वीकारण्याच्या प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता प्रत्यक्षात महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीस सुरवात होत आहे. उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी महापालिका प्रशासनाने दहा ठिकाणी सोय केली आहे.
नाशिक महापालिका हद्दीत यंदा 13 लाख 60 हजार मतदार 122 नगरसेवकांचे भवितव्य ठरवणार आहेत. याकरिता सोळाशे मतदान केंद्रांची निश्चिती करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ठेवण्यात आली असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रत्येक कार्यालय परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज सादर करणे, अर्ज विक्रीसाठी अनामत रक्कम भरणे, निवडणुकीसाठी होणार्‍या खर्चाची नोंद तसेच इतर आवश्यक बाबींसाठी स्वतंत्र प्रत्येक विभागीय कार्यालयात आचारसंहिता कक्ष उभारण्यात आला आहे.

येथे असेल अर्ज स्वीकारण्याची सोय
प्रभाग क्रमांक 1, 2, 3 : पंचवटी विभागीय कार्यालय (तिसरा मजला).
प्रभाग क्रमांक 4, 5, 6 : पंचवटी विभागीय कार्यालय (तिसरा मजला).
प्रभाग क्रमांक 7, 12, 24 : नाशिक पश्चिम विभागीय कार्यालय, पंडित कॉलनी.
प्रभाग क्रमांक 13, 14, 15 : नाशिक पूर्व विभागीय कार्यालय, मेन रोड.
प्रभाग क्रमांक 16, 23, 30 : दिव्यांग विभाग, अटल दिव्यांग स्वाभिमान भवन.
प्रभाग क्रमांक 17, 18, 19 : नाशिकरोड विभागीय कार्यालय, दुर्गा गार्डनशेजारी, नाशिकरोड
प्रभाग क्रमांक 20, 21, 22 : नाशिकरोड विभागीय कार्यालय, दुर्गा गार्डनशेजारी, नाशिकरोड
प्रभाग क्रमांक 25, 26, 28 : सिडको विभागीय कार्यालय, अंबड पोलीस स्टेशनसमोर, सिडको, अंबड.
प्रभाग क्रमांक 27, 29, 31 : सिडको विभागीय कार्यालय, अंबड पोलिस स्टेशनसमोर, सिडको, अंबड.
प्रभाग क्रमांक 8, 9, 10, 11 : सातपूर विभागीय कार्यालय, त्र्यंबकरोड.

 

Municipal Corporation Randhumali; Application submission starts today
 
Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू झाले की, घरोघरी…

6 minutes ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

11 minutes ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

15 minutes ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

27 minutes ago

पाथरे खुर्दमध्ये सशस्त्र दरोडा

शेतकर्‍याला मारहाण करून 12 लाखांचा ऐवज लुटला ♦ किचनचा दरवाजा तोडून चौघांचा बंगल्यात प्रवेश ♦…

34 minutes ago

मोहदरी घाटात कंटेनर उलटला; नाशिक-पुणे महामार्ग ठप्प!

समोरील टायर फुटल्याने अपघात सिन्नर : प्रतिनिधी नाशिक-पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात शुक्रवारी (दि. 16) सकाळी…

40 minutes ago