नाशिक

निवडणुकीच्या कामामुळे करवसुली रखडली; या महिन्यात अवघी चार कोटींचीच वसुली

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेने मालमत्ताधारकांकडील थकबाकी वसुलीसाठी अभय योजना आणली आहे. प्रारंभी सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यांत थकबाकी वसुलीसाठी 95 टक्के शास्ती माफी देण्यात आली होती. याचा परिणाम म्हणून 75 कोटींची वसुली या तीन महिन्यांत झाली. दरम्यान, 1 डिसेंबरपासून शास्तीवर 85 टक्के सवलतीला सुरुवात झाली. मात्र, नाशिक महापालिकेची निवडणूक लागल्याने करवसुली मंदावली आहे. याचे कारण म्हणजे 1 ते 22 डिसेंबरदरम्यान महापालिकेच्या तिजोरीत अवघी चार कोटी 27 लाख 14 हजार 48 रुपये रक्कम जमा झाली आहे.
सध्या महापालिकेसमोर नऊशे कोटींच्या थकबाकी वसुलीचे आव्हान आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर तीन महिन्यांत 75 कोटी 61 लाख 74 हजारांची वसुली झाली. यात सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यांतच प्रत्येकी 28 कोटींची वसुली झाली होती; परंतु नोव्हेंबरपासून कर विभागातील कर्मचार्‍यांवर निवडणुकीची कामे लादल्याने वसुलीकडे दुर्लक्ष झाले. परिणामी नोव्हेंबरमध्ये वसुलीचा आकडा 18 कोटींवर येऊन अडकला. डिसेंबरपासून थकबाकीवर 85 टक्के सूट दिली जात आहे. नाशिक महापालिकेची शास्तीची थकबाकी सव्वातीनशे कोटींवर गेली आहे. याकरिता दरवर्षी अभय योजनेद्वारे जुन्या थकबाकीवर 95 टक्के सूट दिली जात आहे. शहरात घरपट्टीचे एकूण पाच लाख 83 हजार मिळकतधारक आहेत. पण यातील करदात्यांकडे चालू मागणीसह शास्तीची थकबाकी पडून आहे. सद्यःस्थितीत नोव्हेंबरमध्ये महापालिका निवडणूक कामामुळे वसुलीवर परिणाम झाला आहे. तो डिसेंबरमध्येही तसाच असून, निवडणुकीची कामे 16 जानेवारीपर्यंत असल्याने वसुलीत कमालीची घट होणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकासकामांसाठी थकबाकी वसूल करून त्यातून निधी उभारण्याचा उद्देश आहे. महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोेत घरपट्टी, पाणीपट्टीतून मिळणारा महसूल आहे. त्यातून मिळणार्‍या रकमेतून विकासकामे केली जातात. महापालिकेच्या रेकॉर्डवर पाच लाख 82 हजार मिळकतींची नोंद आहे. दोन लाख 12 हजार पाणीपट्टीधारक आहेत. महापालिकेने आउटसोर्सिंगच्या माध्यमातून घरपट्टी व पाणीपट्टी देयक वाटपाचे काम पुण्याच्या संस्थेला दिले आहे. शहरात नवीन पाणीपट्टीधारक शोधण्याबरोबर बिल वाटपाचे काम सुरू आहे. मात्र, त्यातच मनपाच्या निवडणुकीच्या कामाकरिता कर विभागातील कर्मचार्‍यांची नियुक्ती केल्याने थकबाकी वसुली मोहिमेला खंड पडण्याची शक्यता आहे.

विभाग                         वसुली                             करदात्यांची संख्या
सातपूर                   68 लाख 45 हजार                 939 1,383
नाशिक पश्चिम      27 लाख 54 हजार                  675 504
नाशिक पूर्व             65 लाख 83 हजार                 531 1,275
पंचवटी एक कोटी   24 लाख 24 हजार                 2,050
नवीन नाशिक        88 लाख 75 हजार                 643 11,877
नाशिकरोड             52 लाख 29 हजार                 1,167

एकूण                    4 कोटी 27 लाख 14 हजार 48

Tax collection stalled due to election work; only four crores collected this month
Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पिंपळगाव धूम येथे बिबट्याचा तरुणावर हल्ला

नागरिकांच्या धाडसामुळे टळला अनर्थ; भीतीचे वातावरण दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी तालुक्यातील पिंपळगाव धूम येथे बिबट्याने…

2 minutes ago

संविधान बचाव समितीचा तिरंगा मोर्चा

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी मालेगाव : प्रतिनिधी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीसह मतदार यादीच्या…

7 minutes ago

सिडकोत अतिक्रमणांवर कारवाई

तीन ट्रक विविध साहित्य जप्त सिडको : प्रतिनिधी सिडको विभागातील फुटपाथवर करण्यात आलेल्या अनधिकृत अतिक्रमणांविरोधात…

11 minutes ago

सिटी सेंटर मॉल ते विशाल पेट्रोल पंप मार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रस्त्याच्या कामामुळे वाहनचालकांची कोंडी सिडको : प्रतिनिधी शहरातील सुरू असलेली रस्त्यांची कामे आणि नवरात्रोत्सवानिमित्त रस्त्यांवर…

14 minutes ago

कांद्याच्या दरात घसरण; 13 रुपयांपर्यंत दर कमी

पहिली कांदा एक्स्प्रेस 18 ला आगरतळ्यात नवी दिल्ली : प्रतिनिधी सणासुदीच्या तोंडावर सामान्य ग्राहकांसाठी दिलासादायक…

21 minutes ago

दिल्ली पोलिसांनी तिरंगा यात्रा रोखली

अभिजित दिपके, नेहा बोरा यांना अटक ♦♦♦ सेंट्रल पार्क बंद ♦♦♦ 22 हजार जवान तैनात…

35 minutes ago