नाशिक

उत्पन्नवाढीसाठी मनपाचा प्लॅन

जागा बीओटीतून 112 कोटींचे उद्दिष्ट

नाशिक : गोरख काळे
महापालिका उत्पन्नवाढीसाठी गेल्या चार-पाच वर्षांपासून प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, त्यांना यात अद्याप यश आलेले दिसत नाही. दरम्यान, मनपाच्या उत्पन्नाची भिस्त घरपट्टी, पाणीपट्टी, बांधकाम परवानग्या व जाहिरात परवानग्या यातून मिळणारा कर याच पारंपरिक स्रोेतावर आहे. मात्र, आता प्रशासनाने उत्पन्नवाढीसाठी काही निर्णय घेतले असून, त्यात मनपाच्या मिळकती बीओटी तत्त्वावर देऊन त्याद्वारे 112 कोटींच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट आहे. तसेच सहाही विभागांतील उद्यानांत विद्युत खेळण्या लावण्यासाठी जागा भाडेतत्त्वावर दिल्या जाणार आहेत.
महापालिका प्रशासनाने श्वेतपत्रिकेतून उत्पन्नवाढीसाठी करत असलेल्या उपाययोजनेबाबत माहिती दिली. त्यात म्हटले की, नाशिक शहराचे ड्रोन सर्वेक्षण करून जीआयएसमध्ये मॅपिंग केले जाईल. संपूर्ण शहराचे हाय रिझोल्यूशन ड्रोन इमेजच्या सहाय्याने एरियल सर्वेक्षण करून जीआयएसमध्ये मॅपिंग करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. याद्वारे शहरातील अस्तित्वातील यूटिलिटी म्हणजे पाणी, सांडपाणी, विद्युत, गॅसवाहिनी, उद्याने, आरक्षणे, नद्या, नाला, बस, रेल्वेस्थानक, अनधिकृत बांधकामे आदींची माहिती गोळा केली जात आहे. भविष्यात शहर नियोजनाच्या दृष्टीने ही माहिती उपयुक्त ठरणार आहे. नगरनियोजन विभागामार्फत दिल्या जाणार्‍या भूखंड विकास परवानग्या, इमारत बांधकाम परवानग्या व भोगवटा दाखला आदी बीपीएमएस या संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाइन पद्धतीने देण्यात येत आहेत. याद्वारे महापालिका हद्दीतील मालमत्तांचे अचूक व पूर्ण कर निर्धारण करण्याकामी व शहरातील कोणतीही मालमत्ता करआकारणी विना राहू नये याकरिता शहरातील मिळकतींचे जीआयएस मॅपिंगचे काम पूर्ण झाले आहे. नाशिक महापालिकेच्या जागा व विद्युत खांंब जाहिरातींकरिता उपलब्ध करून ई-निविदेद्वारे वाटप करण्यात आले आहेत. त्यापासून वाढीव उत्पन्न प्राप्त होणार आहे. वाणिज्य आस्थापनांच्या इलेक्ट्रॉनिक, एलईडी फ्लेक्सच्या जाहिराती विना परवाना दिसत आहेत. करवसुलीबाबत निविदा काढण्यात येऊन परवाना शुल्क, दंड वसूल करून अतिरिक्त उत्पन्न प्राप्त होणार आहे.

Municipal Corporation’s plan to boost revenue

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

34 minutes ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

37 minutes ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

51 minutes ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

55 minutes ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

59 minutes ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 hour ago