नाशिक

कार्बन नाका परिसरात रिक्षावर कोसळले झाड

सुदैवाने जीवितहानी टळली

सातपूर : प्रतिनिधी
शिवाजीनगर कार्बन नाका येथे एका रिक्षावर भलेमोठे झाड कोसळून रिक्षाचे मोठे नुकसान झाले. मात्र सुदैवाने रिक्षाचालक व प्रवासी नसल्याने मोठी जीवितहानी टळली.
गेल्या 2-3 दिवसांपासून शहरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यातच खोदकाम केल्यामुळे झाडांच्या मुळ्या उघड्या पडल्या आहेत. मुळ्या कमजोर झाल्यामुळे झाड कोसळल्याची घटना घडली. शहरातील धोकादायक झाडे पावसाळ्यापूर्वी न काढल्यामुळे अशा घटना वारंवार घडतात. यापूर्यीही सोमेश्वर मंदिराजवळ झाड कोसळून एकाचा तर आयटीआय सिग्नलजवळ देखील रिक्षावर झाड कोसळून दोन जणांचा बळी गेला होता. वारंवार झाड कोसळून बळी जात असताना महापालिका प्रशासन मात्र, फारसे गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे. सातपूर भागात सकाळपासून पाऊस जोरदार पडत असताना सातपूर शिवाजीनगर कार्बन नाका रोडवर भले मोठे झाड कोसळून रिक्षावर पडले यात रिक्षाचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने रिक्षा चालक तसेच प्रवाशांना जीवित हानी झाली नाही.
गॅस व जलवाहिनीसाठी सातपूर गंगापूर लिंक रोड खोदण्यात आला. खोदकाम करताना झाडांची मुळं उघडी पडून झाडे कमजोर झाली आहेत. ही झाडे धोकादायक बनली आहेत. ठेकेदार मात्र फक्त झाडांच्या बुंध्याजवळ माती ढकलून आपले काम साध्य करीत आहे.

Tree falls on rickshaw in Karbon Naka area

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 hour ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 hour ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

2 hours ago