महाराष्ट्र

मनसेकडून पालिका निवडणुकीची रणनिती ?



अमित ठाकरेंची बंद दाराआड पदाधिकाऱ्यांशी चर्चा


नाशिक : गोरख काळे

एकेकाळी नाशिक शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळ्खले जायचे.  मात्र पक्ष अडचणीत असताना एक-एक करत प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठ्ही दिली.  सध्या पक्षाची स्थिती कमकूवत झाली असली तरी मनसे प्रमुख राज ठाकरे(RAJ THACKERAY) यांच्याकडून करिश्मा होण्याचा आशावाद मनसैनिकांना आहे. 

दरम्यान आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचे पुत्र व मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (AMIT THACKERAY) यांनी नाशिककडे लक्ष केंद्रीत केले.  मंगळ्वारी (दि.28) त्यांनी शहरातील प्रत्येक प्रभागातील पदाधिकाऱ्याशी बंद बंद दाराआड चर्चा केली.

हेही वाचा : राज ठाकरे लीलावतीत आज दाखल होणार

पक्षाला गत वैभव मिळवून देण्याकरिता मनसे युवा नेते अमित ठाकरे(AMIT THACKERAY) यांच्या समोर आव्हान असणार आहे.  पक्षात आलेली मरगळ दूर करण्यासाठी त्यांना नाशिककडे अधिक लक्ष द्यावे लागणार आहे.  मंगळ्वारी त्यांनी शहरातील राजगड कार्यालयावर सहाही प्रभागातील पदाधिकाऱ्यांशी बंददाराआड चर्चा करत, पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिल्याची चर्चा आहे.  बैठकीत केवळ संबंधित प्रभागातील पदाधिकार्यांनाचा प्रवेश होता.

 

सध्या नाशिक महापालिकेत प्रशासकर राजवट असल्याने ऑक्टोबर मध्ये पालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे.  तत्पूर्वी शहरातील पक्ष संघटनेत सुरु काय आहे, याची अमीत ठाकरे यांनी माहिती जाणून घेतल्याचे समजते आहे.  दरम्यान नाशिक हे राज ठाकरे(RAJ THACKERAY)यांचे आवडते शहर राहिले आहे.  परंतू सप्टेंबर 2021 नंतर ते शहराकडे आलेले नाहीत.  2012 साली मनसेने पालिकेत सत्ता मिळवली होती.  परंतु अंतर्गत गटबाजीच्या राजकारणामुळे मोठा फटका पक्षाला बसला. आणि 2017 मधील पालिका निवडणुकीत सपाटून मार खावा लागला.

 

सध्यास्थित राजकीय स्थिती पाहून आगामी नाशिक महापालिका निवडणुकीत पक्षाला पुन्हा ताकद दाखवण्याची संधी असणार आहे.  अमित ठाकरे यांनेी मंगळ्वारी शहरातील काही प्रभागातील पदाधिकाऱ्यांसमवेत बंद दाराआड चर्चा केली.  यात आगामी पालिका निवडणुकीपूर्वी पक्षाची काय तयारी असावी, पक्ष संघटनेत कशा पद्धतीने काम करायला हवे प्रभागातील प्रत्येक नागरिकांपर्यत कसे जाता येइल.  याविषयी सूचना केल्यात.  शिवाय पदाधिकाऱ्यांचे काय मत आहे.  हे देखील जाणून घेतले.

बुधवारी उर्वरीत प्रभागातील पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत.  दरम्यान राज्यातील सत्ता उलथापालथमुळे नागरिकांमध्ये राजकारण्याविषयी रोष असल्याचे दिसत आहे. या सर्व घडामोडीमध्ये मनसे पुन्हा शहरातील राजकारणात महत्वाची भूमिका बजावू शकते.  याकरिता मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी नाशिककडे लक्ष क्ंद्रीत केल्याचे बोलले जात आहे.


हेही वाचा : मनसे नेते बाळा नांदगांवकर आज नाशिक दौऱ्यावर


पक्ष संघटनेत बदलाचे संकते

दरम्यान नाशिक शहरातील मनसेच्या पक्षसंघटनेत बदल होण्याचे संकते अमित ठाकरे यांनी दिले आहे.  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खांदेपालट झाल्यास त्याचा पक्षाला कितपत उपयोग होइल.  हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.  काही दिवसांपासून पक्ष संघटनेत समन्वय नसल्याची जोरदार चर्चा मनसैनिकांमध्येच आहे.  असेच सुरु राहिले तर याचा पक्षाला फटका बसण्याची शक्यता आहे.
….
नाशकात ठाकरे विरुध्द ठाकरे

काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी नाशिकरोड येथे जाहीर मेळावा घेतला होता. त्यानंतर आता मनसेचे विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे यांनी नाशिककडे लक्ष घातल्याचे दिसत आहे. परिणामी आगामी महापालिका निवडणुकीत नाशिककरांसमोर आदित्य ठाकरे विरुद्ध अमित ठाकरे असा संघर्ष पहावयास मिळ्ण्याची शक्यता आहे.

Ashvini Pande

Recent Posts

अभिनेते मनोजकुमार यांचे निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास

मुंबई: शोर, क्रांती, रोटी कपडा और मकान यासारख्या एकसे बढकर एक चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा…

11 hours ago

गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन

गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन नाशिक : प्रतिनिधी गोदावरीचे…

1 day ago

‘एसएमबीटी’त घडत आहेत संशोधक

नाशिक : प्रतिनिधी एसएमबीटी मेडिकल सायन्सेस अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, एसएमबीटी डेंटल कॉलेज संगमनेर, एसएमबीटी इन्स्टिट्यूट…

1 day ago

कुंभमेळा कक्षाची स्थापना, पण कर्मचार्‍यांची वानवा

नाशिक : प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयात कुंभमेळा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी भूसंपादन अधिकारी रवींद्र…

1 day ago

कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्‍यांत चिंता

कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्‍यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…

1 day ago

कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्‍यांत चिंता

कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्‍यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…

1 day ago