नाशिक प्रतिनिधी
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन कुऱ्हाडी ने वार करुन पत्नीस जीवे ठार मारल्याच्या आरोपावरुन पती विरोधात वणी पोलीसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलीसांनी दिलेली माहीतीअशी लहानु मोतीराम धोंगडे व नंदा लहानु धोंगडे हे पती पत्नी चाप्याचा पाडा ,देवसाने तालुका दिंडोरी येथे वास्तव्यास असुन पत्नी नंदा यांचेवर पती लहानु हे नेहमी संशय घेत या बाबीवरुन शाब्दिक चकमक झाली .. पती पत्नी घरी असताना वाद झाला. व रागाच्या भरात लहानुने पत्नी नंदा यांचेवर वार केले.डोक्यावर मानेखाली खांद्यावर झालेल्या हल्यात त्यांचा अंत झाला .घटनेची माहीती पोलीसांना मिळाली पोलीसाःनी घटनास्थळी धाव घेतली.व नंदा यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले वैद्यकीय अधिकारी याःनी नंदा यांना मृत घोषित केले.मयत नंदा यांचा भाऊ लक्ष्मण तुळशीराम धुम वय 30 राहणार चिकाडी सालभोये तालुका सुरगाणा यांनी लहानु धोंगडे यांचे विरोधात फिर्याद दिल्याने लहानु यांचेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला संशयीत आरोपी लहानु यांनाअटक करण्यात आली