सातपूर प्रतिनिधी
शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले खुनाचे सत्र कायम असून, आज सकाळी गंगापूर पाईप लाईन शिवारात आपापसातील वादात एका तरुणाचा खून झाल्याची घटना घडली. पवन पगारे असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. आपसातील वादात दगडाने ठेचून खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, या प्रकरणी अतुल अजय सिंग याला पोलिसानी ताब्यात घेतले आहे. गेल्या पंधरा दिवसांत सात खुनाच्या घटना नाशिकमध्ये घडल्या आहेत. आज सकाळी झालेली ही घटना किरकोळ वादातून झाली आहे.
,हे ही वाचा,
सावधान…मध्यस्थी कराल तर जीव गमवाल!