महाराष्ट्र

अपघाताचा बनाव करत पत्नीचा खून

अपघाताचा बनाव करत पत्नीचा खून

संशयित पतीला अटक, निफाड तालुक्यातील घटना

नाशिक : प्रतिनिधीतामसवाडी (ता. निफाड) येथे अनैतिक संबंधातून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना घडली असून, संशयिताने मेव्हुण्यावरही कोयत्याने वार केले आहेत. याप्रकरणी संशयित पतीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, गंभीर जखमी पत्नी व मेव्हुण्याला संशयितच उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात घेऊन आला असता, सिव्हिल पोलीस चौकीतील पोलीसांच्या चाणाक्षतेमुळे संशयिताने रचलेला अपघाताचा बनाव उघडकीस आला. मात्र, जखमी मेव्हुण्याच्या फिर्यादीनुसार पती-पत्नीच्या वादातून खून झाल्याचे म्हटले आहे.
मनोज रमेश पोतदार (३३, रा. तामसवाडी, ता. निफाड) असे अटक करण्यात आलेल्या संशयित पतीचे नाव आहे. वर्षा मनोज पोतदार (२९) असे मयत विवाहितेचे नाव असून, लाला बाळू शेवरे(३० रा. तामसवाडी) हा गंभीर जखमी आहे.
जखमी लाला शेवरे याच्या फिर्यादीनुसार, संशयित मनोज यास दारुचे व्यसन आहे. त्यावरून त्याची व पत्नी वर्षा यांच्यात सातत्याने भांडण होत असे. बुधवारी (ता. १३) दुपारीही त्यांच्या वाद झाले असता, त्यावेळी संतापामध्ये संशयित मनोज याने कोयत्याने पत्नी वर्षावर वार केले. यात ती गंभीररित्या जखमी झाले. त्यावेळी बचावासाठी गेलेल्या मेव्हुणा शेवरे याच्यावरही संशयिताने कोयत्याने वार केले. त्यानंतर संशयितानेच दोघा जखमींना चांदोरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता, त्यांच्या प्राथमिक उपचार करून नाशिक जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. याठिकाणी उपचारादरम्यान मध्यरात्री वर्षाचा  मृत्यु झाला. याप्रकरणी संशयित मनोज याच्याविरोधात खुनासह प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago