फरार आरोपीला नाशिकरोड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नाशिकरोड : प्रतिनिधी
अमरावती येथून खून करून पसार झालेल्या संशयिताला नाशिकरोड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. सुरज सुभाष मारवे (वय 29 रा.सुदर्शन नगर फैजलपुरा अमरावती) असे ताब्यात घेतलेल्या सशयिताचे नाव आहे. मारवे याने चार महिन्यापूर्वी अमरावती मध्ये खून करून फरार झाला होता. मात्र त्यास नाशिकरोड पोलिसांनी सापळा रचत ताब्यात घेतले.
याबाबत माहिती अशी कीं, नाशिकरोड पोलीस ठाण्याचे कर्मचारी विशाल पाटील यांना गुप्त माहिती मिळाली की अमरावती शहरातील फैजलपुरा पोलीस ठाण्यातील 302 मधील मुख्य आरोपी सुरज सुभाष मारवे वय 29 राहणार सुदर्शन नगर फैजलपुरा अमरावती हा फरार असल्याचे समजले त्यानंतर पाटील व त्यांचे सहकारी गस्त घालित असताना रेल्वे स्टेशन परिसरात संशयित मारवे हा असल्याचे समजले त्यानंतर त्याची चौकशी केली असता तो खुनातील आरोपी असून गेल्या चार महिन्यापासून तो फरार होता.
संशयित मारवे यास अटक करण्यात आली असून नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी यासंदर्भात अमरावती पोलीस स्टेशनला संपर्क साधून या आरोपी बद्दल माहिती दिली. लवकरच या आरोपीला अमरावती पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. दरम्यान या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त अंकुश शिंदे उपायुक्त चंद्रकांत खांडवी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे पोलीस निरीक्षक गणेश नायदे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे तसेच विशाल पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे वसंत काकड अविनाश देवरे मनोहर शिंदे सोमनाथ जाधव राकेश बोडके केतन कोकाटे आदींचे अभिनंदन केले आहे.
*छगन भुजबळ यांनी घेतले काळाराम मंदिरात दर्शन* नाशिक: प्रतिनिधी श्रीराम नवमीच्या निमित्ताने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री…
कर्जमाफी देऊ नका आणि जखमेवर मीठही चोळू नका महायुतीतील भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस…
नाशिक: प्रतिनिधी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्री…
अंमली पदार्थ विकणार्यांशी कनेक्शन उघड सिडको : विशेष प्रतिनिधी नाशिक पोलीस दलात मोठा घोटाळा उघडकीस…
मुंबई: शोर, क्रांती, रोटी कपडा और मकान यासारख्या एकसे बढकर एक चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा…
गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन नाशिक : प्रतिनिधी गोदावरीचे…