नाशिक: रयत शिक्षण संस्थेनंतर दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी संस्था असलेल्या मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून 28 ऑगस्टला मतदान होणार आहे. तर मतमोजणी सोमवार दिनांक 29 रोजी होणार आहे. शुक्रवार दिनांक 5 ऑगस्टपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत 11 पर्यंत असून 12 ला छाननी होणार आहे. लवादाकडे अपील करण्याची मुदत 13 व 14 ऑगस्ट आहे 16 ऑगस्ट ला अंतिम उमेदवारी यादी जय होणार आहे 19 ऑगस्ट उमेदवारी अर्ज माघारीची अंतिम तारीख आहे 28 ऑगस्ट ला सकाळी आठ ते चार या वेळात मतदान होऊन 29 ला सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी प्रारंभ होणार आहे मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या निवडणुकीसाठी सध्या नीलिमा ताई पवार आणि एडवोकेट नितीन ठाकरे यांच्या पॅनेलमध्ये सरळ लढत होणार आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच सद्या दोन्ही बाजूने जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहे, या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही नाशिक दौऱ्यात नीलिमा पवार यांच्याशी चर्चा केली, सभासदांचा कल लक्षात घेऊन उमेदवार देण्याच्या सूचना त्यांनी केल्या, सद्या संपुर्ण जिल्हाभर सभासदांच्या भेटीगाठी सुरू असून, विद्यमान कार्यकर्णीकडून शाळांच्या नामकरण समारंभाचा धडाका सुरू आहे, तर नितीन ठाकरे हे जोरदारपणे निवडणूक रिंगणात उतरले आहेत, संस्थेत सुरू असलेल्या मनमानी कारभाराबद्दल त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे, त्यामुळे यावेळची निवडणूक चांगलीच गाजणार असल्याचे चिन्हे आहेत,
घिबली अॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…
नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…