नाशिक

नांदगावला पाणीटंचाईसंदर्भात आढावा बैठक

नांदगाव ः प्रतिनिधी
नांदगाव तालुक्यातील उपलब्ध जलसाठे, त्यातील क्षमता व शेतीसिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकार्‍यांसोबत आमदार सुहास कांदे यांनी मंगळवारी (दि. 6 ) आढावा बैठक आयोजित करत संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत.
तालुक्यात दोनशेच्यावर पाझर तलाव, बंधारे, लहान-मोठे धरणे असून, त्यातील गाळ काढून आहे त्या ठिकाणची साठवण क्षमता वाढविण्यासाठी तातडीने प्रस्ताव तयार करा व तालुक्याला टँकरमुक्त करण्याच्या दिशेने प्रयत्न करावे, असे आवाहन आमदार सुहास कांदे यांनी या आढावा बैठकीदरम्यान केले.
पिण्याच्या पाण्याची समस्या काही प्रमाणात मार्गी लागली आहे. शेतकर्‍यांच्या शेतात सिंचनाचे पाणी पोहचावे याबाबतचा शब्द आमदार कांदे यांनी दिला होता. तो पूर्ण करण्यासाठी कालबद्ध नियोजनाचा भाग म्हणून मंगळवारी आमदार कांदे यांनी या आढावा बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी आमदार कांदे यांनी तालुक्यातील उपलब्ध जलसाठे, त्यातील क्षमता याचा सांगोपांग आढावा घेतला. जलसंधारणाची कामे वाढविण्यासोबत गाळ काढण्याचा कृती आराखडा निश्चित करावा. त्यासाठी देवाज फाउंडेशनच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्याचा शब्ददेखील त्यांनी यावेळी दिला.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी माणिकपुंज धरणामागील क्षेत्रात नव्या प्रकल्पाची आवश्यकता व्यक्त करताना यंत्रणेने अधिक सकारात्मक बघण्याची आवश्यकता व्यक्त केली. समाधान पाटील यांनी पांझण, मन्याड, शाखांबरी, लेंडी व अन्य लहान नद्यांचे संलग्नीकरण असलेला तालुका अंतर्गत नदीजोड प्रकल्प हाती घेण्याची मागणी केली. यावेळी तहसीलदार सुनील सौंदाणे, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण पाठक, तालुका कृषी अधिकारी डबाळे, वनपरिक्षेत्र अधिकारी हेमंत कोकाटे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी उपविभाग मालेगाव अंकिता वाघमारे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण उपविभाग मालेगाव उपअभियंता माणिकपुंज प्रकल्प नागासागा प्रकल्प, गिरणा धरण प्रकल्प सहाय्यक कार्यक्रम अधिकारी रोहयो नांदगाव तसेच याप्रसंगी ज्येष्ठ नेते प्रकाश कवडे, माजी आमदार संजय पवार, बाजार समिती संचालक एकनाथ सदगीर, अमोल नावंदर, सतीश बोरसे, किशोर लहाने, समाधान पाटील, प्रमोद भाबड, सागर हिरे, प्रकाश शिंदे, शरद सोनवणे, नितीन आहेर, अ‍ॅड. अमोल आहेर, भैयासाहेब पगार आदी उपस्थित होते.

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago