नाशिक

नदीच्या पुलावरून पडून दुचाकीस्वार गंभीर जखमी

सिडको विशेष प्रतिनिधी : सातपूर-अंबड लिंक रोडवरील नंदिनी नदीवर नव्याने उभारण्यात आलेल्या सिमेंट पुलावरून एकजण दुचाकीसह नदीत पडल्याची घटना घडली. पुलाला कोणताही सुरक्षा कठडा नसल्यानेे ही दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र गौतम (वय 37, रा. बजरंगनगर, लिंक रोड) दुचाकीवरून जाताना या पुलावरून सुमारे 30 फूट खोल नदीत पडले. पुलाला सुरक्षा कठडे नसल्यानेे आणि पुढील भागाचे काम सुरू असल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात. या घटनेनंतर सातपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि नदीपात्रात उतरून नरेंद्र गौतम यांना बेशुद्धावस्थेत बाहेर काढले. तत्काळ 108 रुग्णवाहिकेच्या सहाय्याने प्राथमिक उपचार देण्यात आले. उपचारानंतर शुद्धीवर आलेल्या गौतम यांनी आपण कसे पडलो हेच कळले नाही, असे सांगितले. या अपघातात त्यांच्या पाठीच्या मणक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर नाशिकच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी सातपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू पठाण, उपनिरीक्षक शिवराम खांडवी, पूजा भांगरे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल खांडबहाले, राजू जाधव तसेच अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल रमेश पवार, अशोक श्रीकांडे व 108 रुग्णवाहिकेचे डॉक्टर व वाहनचालक चंद्रशेखर जोशी यांनी मदतकार्य केले.

Editorial Team

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

19 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

19 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

19 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

19 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

19 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

19 hours ago