त्र्यंबकेश्वर ः प्रतिनिधी
श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पायी आषाढवारीसाठी 10 जून 2025 रोजी संत निवृत्तिनाथ महाराज पालखी प्रस्थान होत आहे. श्री संत निवृत्तिनाथ संजीवन समाधी मंदिर संस्थान विश्वस्त मंडळाने यंदा बैलजोडी निवड पारदर्शक प्रक्रिया राबवली. या स्पर्धेचा निकाल विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अॅड. सोमनाथ घोटेकर यांनी सोमवारी (दि. 5) सायंकाळी जाहीर
केला.
संत निवृत्तिनाथ मंदिरातून पालखी प्रस्थान होताना माजी नगराध्यक्ष सुनील अडसरे,अजय अडसरे यांची यंदाही मानाची बैलजोडी राहणार आहे. त्यानंतर पुढील प्रवासासाठी निवड करताना निरीक्षक, परीक्षक आणि विश्वस्त या सर्वांच्या समितीने तीन बैलजोड्या निवडलेल्या आहेत.
त्यात निवृत्ती दगू भुजाडे (विसापूर), सचिन सुधीर शिखरे (त्र्यंबकेश्वर), मातुलेश्वर भजनी मंडळ मातोरी या तीनजोड्या क्रमाने सेवा देतील, असे जाहीर केले आहे. ही निवडप्रक्रिया राबवण्यासाठी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अॅड. घोटेकर, श्रीपाद कुलकर्णी, पालखी सोहळाप्रमुख नवनाथ महाराज गांगुर्डे, माजी अध्यक्ष व विश्वस्त नीलेश गाढवे पाटील, हभप कांचनताई जगताप, नारायणबाबा मुठाळ, हभप माधवदास राठी, विश्वस्त मंडळ, संस्थानचे व्यवस्थापक गंगाराम झोले, संदीप मुळाणे, मनोज भांगरे यांनी परिश्रम घेतले.
पालखी प्रस्थान करताना असलेली मानाची जोडी माजी नगराध्यक्ष सुनील अडसरे यांची असते. यावर्षीची बैलजोडी खास देखणी मोठी खिल्लारी प्रकारातील आहे. याबाबत अजय अडसरे यांनी माहिती दिलीे.त्यांनी ही बैलजोडी जेऊर हायबती (ता. नेवासे) येथील कृष्णा मच्छिंद्र मस्के आणि संतोष बापूसाहेब मस्के यांच्याकडून मागवली आहे.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…