310 ची मॅजिक फिगर ठरवणार भवितव्य
नाशिक : प्रतिनिधी
राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी तब्बल 99.84 टक्के मतदान झाले. निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे बाजी मारणार की अपक्ष उमेदवार गोकुळ गिते, याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल होण्यापासूनच या निवडणुकीत राजकीय घडामोडींची मालिका सुरू होती आणि मतदानाच्या अखेरच्या दिवसापर्यंत त्यात नवे ट्विस्ट पाहायला मिळाले.
महायुतीने प्रतिष्ठेची केलेली ही निवडणूक सुरुवातीपासूनच चर्चेत राहिली. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी मोठे प्रयत्न केले. शिवसेनेच्या वाट्याला जागा गेल्यानंतर भाजपचे नगरसेवक गणेश गिते यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून बंडखोरीचा इशारा दिला होता. मात्र, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी उमेदवारी मागे घेतली.
यानंतर अपक्ष उमेदवार म्हणून गोकुळ गिते आणि प्रसाद हिरे मैदानात होते. प्रसाद हिरे यांनीही मुदत संपण्यापूर्वी उमेदवारी मागे घेतली. मात्र, गोकुळ गिते यांच्या माघारीसाठी झालेल्या प्रयत्नांची राज्यभर चर्चा झाली. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि तीन मंत्र्यांनी त्यांच्याशी संपर्क साधल्याची चर्चा होती.अखेर गोकुळ गिते यांनी प्रचार थांबवला; मात्र उमेदवारी कायम ठेवल्याने निवडणूक अटळ ठरली. दरम्यान, ठाकरे गटाने अपक्ष उमेदवारांना मतदान करण्याचा निर्णय जाहीर केल्याने गोकुळ गिते यांच्या पारड्यात मते पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे निवडणुकीतील उत्सुकता आणखी वाढली. मतदानाच्या आदल्या दिवशी सोशल मीडियावर ‘पसंती क्रमांक एक – गोकुळ गिते’ असा संदेश आणि मतपत्रिकेचा नमुना व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या प्रकाराची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. त्यानंतर गणेश आणि गोकुळ गिते बंधूंनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. प्रचार थांबवल्यानंतर आम्ही पूर्णपणे निष्क्रिय होतो. या निवडणुकीशी आमचा कोणताही संबंध नाही. महायुतीच्या अधिकृत उमेदवारालाच मतदान करावे. अफवांवर विश्वास ठेवू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, गेल्या काही दिवसांतील घडामोडी, मतांच्या संभाव्य फोडाफोडीच्या चर्चा आणि गुप्त मतदानाची पद्धत यामुळे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे आणि अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांच्यातील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आता 22 जून रोजी होणार्या मतमोजणीत मतदारांनी नेमका कौल कुणाला दिला, याचा फैसला होणार आहे.
अशी आहे पक्षीय स्थिती
महायुतीकडे भारतीय जनता पक्षाचे 188, शिवसेने(शिंदे गट)चे 171 आणि राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट)चे 107 असे एकूण 466 मतांचे संख्याबळ आहे. तर महाविकास आघाडीकडे शिवसेने(उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)चे 45 आणि काँग्रेसचे 13 अशी एकूण 58 मते आहेत. त्यामुळे आकड्यांची बाजू महायुतीच्या बाजूने असली, तरी गुप्त मतदानामुळे निकालाबाबतची उत्सुकता कायम आहे.
Narendra Darade or Gokul Gite?
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू झाले की, घरोघरी…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…
शेतकर्याला मारहाण करून 12 लाखांचा ऐवज लुटला ♦ किचनचा दरवाजा तोडून चौघांचा बंगल्यात प्रवेश ♦…
समोरील टायर फुटल्याने अपघात सिन्नर : प्रतिनिधी नाशिक-पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात शुक्रवारी (दि. 16) सकाळी…