नर्मदे हर …..
लेखक: रुपाली जाधव,सटाणा
नर्मदा परीक्रमा पूर्ण करण्याचे स्वप्न गेल्या 2वर्षांपासून मनात घोळत होते .पण कदाचित माईचं बोलावणं मला आलं नव्हतं .ह्या वर्षी मात्र मनाने पूर्ण निश्चय केला होता .उन्हाचा तडाखा बघता 21कि .मी .अंतर पायी चालू शकेल का ?ह्या विषयी थोडी धाकधूक होती .पण मनाचा निश्चय पक्का होता .चैत्र शुद्ध अष्टमीला नर्मदे हर चा गजर करत आमच्या प्रवासाला सुरुवात झाली एक एक करत आम्ही 33सखी जमलो .जणू काही 33सखींच्या भेटीचं नर्मदेला वाण लावायला निघालो होतो .
दुपारी 2:00वाजता सुरु झालेला आमचा प्रवास सखीं सोबत भजने ,गाणी ,गप्पा करत महाराष्टरातून गुजरात राज्यात केव्हा येऊन पोहचलो ते कळलेच नाही .रात्री 10वाजता आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी वासन ग्रामातील वासुदेव आश्रमात पोहचलो .तेथे पोहचल्यावर थोडे फ्रेश होऊन तेथील गुरूंनी आमच्या कडून परिक्रमेचा संकल्प सोडून घेतला .माझं त्या मंत्रांकडे कमी पण नर्मदा माईच्या मूर्तीकडे जास्त लक्ष होत .भगवती इथपर्यंत बोलावलच आहे तर परिक्रमा सुखरूप पूर्ण करून घे इतकंच मागणं आहे तुझ्या कडे .संकल्पानंतर आश्रमातच आमच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती .इतक्या लांबच्या प्रवासाचा खूप थकवा आला होता .पण आश्रमातील आदरातिथ्य बघून मन भारावून गेलं होत .जणू आम्हा माहेरवाशिणीचं स्वागत त्यांच्या रूपाने नर्मदा मैय्या करत होती .आमच्या मुक्कामाची व्यवस्था जवळच पंडाल मध्ये केलेली होती .धरतीचे अंथरूण अन आकाशाचे पांघरूण घेऊन आम्ही निद्रादेवीची आराधना करत होतो .जेमतेम 1तासाची झोप घेऊन आम्ही सकाळचे आन्हिक उरकले .नर्मदेला श्वेत रंग प्रिय आहे म्हणून आम्ही सगळ्या सखी पांढऱ्या रंगाचे ड्रेस घालून सज्ज झालो .भगवतीच्या गजर करत रात्री 2:00वा आमच्या परिक्रमेला सुरुवात केली .
त्या रात्रीची गर्दी बघून ,दुतर्फा उजळणारे लाईट्स बघून ती रात्रीची 2 वाजेची वेळ आहे असे सांगूनही खरे वाटले नसते .सुरवातीचा थोडा प्रवास दगडांतून आहे .त्या वरून चालताना थोडी कसरत होते .पण video बघितलेले होते त्या मुळे रस्त्याची थोडी कल्पना होती .नर्मदे हर चा गजर करत आमची परिक्रमा सुरु झाली .थोडस ह्या परिक्रमेविषयी सर्वप्रथम उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा म्हणजे काय ?कोणत्याही नदीने उत्तर दिशेने वाहणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते .जसे कि काशी येथे गंगा नदी वरुण घाटापासून अस्सी घाटापर्यंत उत्तर वाहिनी होते .म्हणून काशी अत्यंत पुण्यदायी आहे .तसेच नर्मदा माई हि रामपुरा ते तिलकवाडा ह्या दरम्यान आपला पूर्व ते पश्चिम मार्ग सोडून उत्तर दिशेने ह्या भागात वाहते .
रामपुरा येथे नर्मदा नदी उत्तरवाहिनी होते आणि पुढे तिलकवाडा पर्यंत ती उत्तरवाहिनी राहते .आणि नंतर तिचा प्रवाह पूर्वव्रत होतो .रामपुरा ते तिलकवाडा आणि परत तिलकवाडा ते रामपुरा ह्या साधारण 21कि .मी .मार्गावर नर्मदेच्या तीरावरून केलेल्या प्रवासाला ‘नर्मदा परिक्रमा ‘म्हणतात .ह्याचा उल्लेख ‘नर्मदा पुराण ‘व ‘स्कंध पुराण ‘ ह्यांमध्ये आढळतो .नर्मदा माईची पूर्ण परिक्रमा करणे प्रत्येकालाच शक्य होईल असे नाही .त्यांच्या साठी हि उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेचा पर्याय योग्य ठरतो .
तर अशा ह्या पवित्र पावन परिक्रमेचा वासन येथून सुरु झालेल्या प्रवासात काही मंदिर लागतात .ब्रम्ह मुहूर्तावर श्रीकृष्ण मंदिरात दर्शन घेतले .पुढे वाटेत महादेव मंदिरात दर्शन घेतले .पैलतीरी जाण्यासाठी नावेच्या रांगेत उभे राहिलो 1तासाच्या वेटिंग नंतर आमचा नावेसाठी नंबर लागला .मध्ये नव्याने तयार केलेला नंदी घाट आहे इथे 108 शिवलिंग स्थापन केलेले आहेत तेथे थोडे फोटो काढले .पुढे रामजानकी आश्रम लागतो तेथे राम भजन पहाटेच्या वातावरणात मंजुळ भर घालत होते .संपूर्ण परिक्रमेत जागोजागी भाविकांना सेवा देणारे लोक असतात .नर्मदा मातेच्या मंदिरात मातेसाठी आणलेली ओटी भरून आम्ही मनोभावे तिची आरती केली .आता पर्यंतच्या मार्गात अंधाराने आमची सोबत केली होती .मगरींचे साम्राज्य ह्या नदीत जास्त प्रमाणात असल्यामुळे जागोजागी पात्राला जाळ्या लावल्या आहेत .परंतु पायऱ्या उतरून नदीच्या पात्राकडे जातांना समोरचं सूर्योदयाचे मनोहर दृश्य बघून क्षणभर पावलं तिथंच थबकली .खूप दिवसांनंतर संपूर्ण सूर्योदयाचे दर्शन घेतले .नदीपात्रात माईंचं पूजन केलं .रविराजाला अर्घ्य अर्पण करून नर्मदा अष्टकाच पठण केलं .जणू काही नर्मदा मैय्या तिच्या लेकींना स्वतःच्या हाताने स्नान घालत होती .सोबत थोडे तीर्थ घेऊन आम्ही परिक्रमा पुढे सुरु झालीव.उजाडल्यावर आमच्या पावलांचा वेग मंदावला .शेवटचा 2कि.मी .च्या प्रवासात माझ्या पायांनी आपला रंग दाखवायला सुरुवात केली होती .सोबत आणलेले तीर्थ घाटातील तिर्थेश्वर महादेव मंदिरात अर्पण केले .रस्त्यात अनेक छोटी मंदिर लागतात .तेथील दर्शन घेऊन आम्ही 9वाजता आश्रमात पोहचलो .
त्यावेळचा आनंद शब्दात व्यक्त करणे शक्य नाही .ज्या व्यक्तीला पाच पावलं चालतांना त्रास होतो तिची 23कि .मी .ची परिक्रमा नर्मदा माईंनी अगदी हसत पूर्ण करून घेतली .आश्रमात आल्यावर थोडे relax होऊन आम्ही राम जन्माची तयारी सुरु केली .आश्रमात मोठ्या उत्साहाने आम्ही सर्व सखींनी रामरक्षा ,रामस्तुती ,रामाचे भजन म्हणत रामजन्म साजरा केला .त्या नंतर कन्यापूजन साठी अनेक कन्या आश्रमात आलेल्या होत्या .घरून आणलेल्या साहित्याने आम्ही कन्यापूजन केले .आम्ही सर्व सखींनी आमच्या अल्पमती प्रमाणे यथाशक्ती कन्या पूजन केले .काही मोठ्या भगिनींना सोबत आणलेल्या साड्यांचे वाटप केले .
त्यानंतर भोजनाची व्यवस्था आश्रमात होती .भोजन करून आश्रमाची नाममात्र देणगीची (100/-रु .) पावती दिली .आम्ही माईचा निरोप घेऊन परतीच्या प्रवासाला सुरुवात केली .वाटेत गरुडेश्वर ,शबरीधाम ,कुबेरधामाचे दर्शन घेऊन आम्ही रात्री 11:30वाजता सटाण्यात पोहचलो .ह्या प्रत्येक ठिकाणाची महती वेगवेगळी आहे .रामनवमीच्या पावन मुहूर्तावर आमची परिक्रमा नर्मदा माई ने पूर्ण करून घेतली.असं म्हणतात ह्या परिक्रमेत नर्मदा माता आपल्याला कोणत्याही स्वरूपात दर्शन देते .आपल्याला ओळखता यायला हवं .मग काय माझं मन विचार करायला लागलं .तर ह्या परिक्रमेत मला भेटलेल्या नर्मदा सर्वप्रथम वर्षाताई ज्यांच्या मुळे हि परिक्रमा करण्याचं धाडस ,सहकार्य ,मार्गदर्शन मिळालं .त्या नंतर माझ्या सर्व सहकारी सखी ज्या एका sms वर ह्या परिक्रमेसाठी तयार झाल्या .साधना ताई ,रेखा ताई ,स्मिता ,मीनाक्षी ह्यांच्या रूपात मला नर्मदा मैय्या भेटली .आमच्या सहप्रवासी असणाऱ्या उषाताई ह्या तर साक्षात खळखळ वाहणाऱ्या नर्मदाच आपल्या वयाला लाजवतील असा उत्साह आम्हा सर्वाना देऊन गेला .त्यांच्या कडून आम्ही नवनविन रेसिपी शिकायला मिळाल्या .आमची सखी पल्लवी ताई तिच्या पावलांची तर खरचं कमाल गिरनार वारी ,पंढरपूर वारी कोणतीही वारी त्यांनी सोडली नाही . परिक्रमा पूर्ण करून दोन दिवसात सप्तशृंग गडाच्या पायी वारीला निघणार होत्या .तर अशा ह्या सर्व सखींमध्ये मला नर्मदा मातेचं दर्शन झालं .माझी पूर्ण झालेली नर्मदा परिक्रमा गुरुचरणी ,आईवडिलांच्या चरणी अर्पण करून माझ्या लेखणीला विराम देते .जशी आमची परिक्रमा पूर्ण झाली तशी तुम्हा सर्वांची होवो हि भगवती चरणी प्रार्थना .
रुपाली राहुल जाधव
सटाणा
नांदगाव: प्रतिनिधी मालेगाव येथील हॉटेल शिवा पंजाब येथे भाजीमध्ये झुरळ आढळून आले या संदर्भात व्यवस्थापक…
न्यूरो सर्जन वळसंगकर आत्महत्येला वेगळा अँगल नेमक्या कोणत्या कारणामुळे डॉक्टरांनी घेतल्या गोळ्या झाडून सोलापूर: सोलापूर…
*संकोच... लेखिका: अंजली रहाणे/थेटे *संकोच हा वैरी सत्याचा* *संकोच हा घात नात्याचा* संकोच अर्थात संशय…
*बीडचा बिहार आणि सरकारचा बधिरपणा!* *लेखिका : सीमाताई मराठे* धुळे. मो. 9028557718 लोकशाही प्रणालीत…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नाशिक दौरा अचानक रद्द नेमके काय कारण घडले? नाशिक: प्रतिनिधी राज्याचे…
संडे अँकर तेच गद्दार, तेच हिंदुत्व, तीच टीका, तीच भूमिका महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या…