नाशिक @ 7.4 : हंगामातील नीचांकी तापमान

गारठा वाढला; जिल्हा राज्यात दुसर्‍या क्रमांकावर

नाशिक : प्रतिनिधी
शहरासह जिल्ह्यात थंडीची लाट आल्यानंतर यंदाच्या हंगामातील सर्वांत कमी तापमानाची 7.4 अंश सेल्सिअसची नोंद शुक्रवारी (दि. 19) करण्यात आली. यापूर्वी मागील शुक्रवारीच तापमानाचा पारा 7.8 वर आला होता. राज्यात अहिल्यानगरचे तापमान सर्वात कमी 7.3 इतके नोंदवण्यात आले. त्यानंतर दुसरा क्रमांक नाशिक जिल्ह्याचा लागला. गेल्या आठ दिवसांत शहरात किमान तापमानाचा पारा तब्बल 4 अंशांपेक्षा जास्त घसरला आहे. 24 तासांत पार्‍यात तब्बल 2.4 अंशांची घट नोंदवण्यात आली.
शुक्रवारी (दि.19) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास 7.4 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान पेठरोडवरील हवामान केंद्रात मोजण्यात आले. निफाडमध्येही नीचांकी 5.4 अंश तापमानाची नोंद करण्यात आली. उत्तर भारतातून एकापाठोपाठ मार्गक्रमण करणार्‍या पश्चिमी झंझावात प्रकोपामुळे थंड वारे राज्याकडे झेपावत आहेत. यामुळे थंडीची तीव्रता वाढविण्यासाठी अनुकूल अशी वातावरणीय स्थिती सध्या निर्माण झाली आहे. यामुळे मुंबईसह कोकणाचा भाग वगळता राज्यात सर्वच शहरे गारठली आहेत. मागील महिन्यात निफाडचे तापमान 7 अंशांपर्यंत खाली आले होते. त्यानंतर मागील आडवठ्यात शुक्रवारीही निफाडचा पारा सातच्या खाली आला होता.

अजून तीन दिवस कडाका

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळांमुळे पहिल्या आठवड्यात तापमानात चढ-उतार पाहावयास मिळाला होता. त्यातच उत्तरेत सुरू झालेली बर्फवृष्टी आणि थंड वारे वाहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.

वार                      दिनांक                  किमान
शुक्रवार                    (दि. 12)                    7.8
शनिवार                   (दि. 13)                    8.6
रविवार                    (दि. 14)                    9.9
सोमवार                   (दि. 15)                    9.4
मंगळवार                 (दि. 16)                    8.8
बुधवार                    (दि. 17)                    10.4
गुरुवार                    (दि. 18)                    9.8
शुक्रवार                   (दि. 19)                    7.4

Nashik @ 7.4: Lowest temperature of the season

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *