नाशिक

नाशिक भाजपचा अमृत वचननामा जाहीर

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने चेहरामोहरा बदलवणार

नाशिक : प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीने नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी कुंभ पर्वातील अमृत वचननामा जाहीर केला असून, या वचननाम्याच्या माध्यमातून नाशिक शहराला शाश्वत व सर्वांगीण विकासाच्या दिशेने नेण्याचा ठोस आराखडा मांडण्यात आला आहे, असे प्रतिपादन भाजपा नाशिक महानगर-जिल्हा अध्यक्ष सुनील केदार यांनी केले. वसंतस्मृती कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आगामी मनपा निवडणुकीत भाजपचे 100 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी व्यासपीठावर नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे, नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले, महानगर सरचिटणीस सुनील देसाई, प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे, काशीनाथ शिलेदार, पीयूष अमृतकर, राजेंद्र दराडे आदी उपस्थित होते.
केदार म्हणाले की, अमृत वचननामा हा केवळ आश्वासनांचा दस्तऐवज नसून, दूरदृष्टीने आखलेल्या पायाभूत विकासकामांचा ठोस आराखडा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ नाशिक शहराला मिळत आहे. प्रधानमंत्री आवास योजना, स्मार्ट सिटी प्रकल्प, महिला सक्षमीकरणाच्या योजना, आरोग्य, शिक्षण, हरित व स्वच्छ नाशिकसाठी भाजप कटिबद्ध आहे.
मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात आमदार देवयानी फरांदे यांच्या माध्यमातून 350 कोटींहून अधिक रुपयांची मराठा वसतिगृह, सावित्रीबाई रुग्णालय, सुपर स्पेशालिटी वैद्यकीय सेवा, क्रीडासंकुल, जलतरण तलाव, उद्याने व अन्य विकासकामे झाली आहेत. नाशिक पश्चिममध्ये आमदार सीमा हिरे यांच्या मतदारसंघात 300 कोटींहून अधिक रुपयांची पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, पोलीस स्टेशन व ईएसआय रुग्णालयाची कामे पूर्णत्वास येत आहेत. नाशिक पूर्वमध्ये आमदार राहुल ढिकले यांच्या मतदारसंघातही 300 कोटींहून अधिक रुपयांची विकासकामे झाली असून, अनेक प्रकल्प प्रस्तावित आहेत. नाशिकच्या वाहतूक व्यवस्थेसाठी बाह्य रिंगरोड, द्वारका सर्कल अंडरपास, रस्त्यांचे रुंदीकरण व काँक्रिटीकरणाचे प्रकल्प मंजूर व प्रस्तावित असून, यामुळे नाशिक महानगर जगाच्या नकाशावर विकसनशील शहर म्हणून नावारूपाला येईल, असा विश्वास सुनील केदार यांनी व्यक्त केला.

गाजराचा हलवा करून खाल्ला

नाशिकरोड येथे काही नाराज कार्यकर्त्यांनी भाजपाचे शहराध्यक्ष सुनील केदार यांना निष्ठावंतांवर अन्याय झाला. उमेदवारीचे गाजर दाखविले. प्रत्यक्षात उमेदवारी दुसर्‍यांनाच दिल्याने नाराज झालेल्या इच्छुकांनी गाजर भेट दिले होते. काल माध्यमांनी यासंदर्भात शहराध्यक्ष सुनील केदार यांना त्या गाजराचे काय केले, असे विचारले असता केदार यांनीही मिश्किलपणे हलवा करून खाल्ला आणि प्रचाराला लागलो, असे उत्तर दिल्याने एकच हशा पिकला. स्वतः केदारही हसले. याबद्दलची पोस्ट समाजमाध्यमांवर व्हायरल झाली. त्यावर नेटकर्‍यांनीही कधी विरोधी तर कधी मिश्किल दाद दिली.

कुंभमेळा भाजपचा मुख्य अजेंडा
साधू-संतांसाठी प्राथमिक सुविधा प्राधान्याने सुनिश्चित करणार. भाजपच्या कुंभ पर्वातील अमृत वचनात देशभरातून येणार्‍या साधू-संत-महंतांसाठी आरक्षित जागा, प्राथमिक गरजा आणि सोयीसुविधा पुरविणे हे प्रमुख संकल्प आहे.
– सुनील केदार, अध्यक्ष, भाजप नाशिक महानगर

Nashik BJP’s Amrit Vachnama announced

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

18 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

18 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

18 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

18 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

18 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

18 hours ago