नाशिक

मालवाहू ट्रकच्या धडकेत नाशिकचे पती-पत्नी ठार

विंचूर-प्रकाशा महामार्गावर अपघात

देवळा : प्रतिनिधी
येथील विंचूर-प्रकाशा राष्ट्रीय महामार्गावर रामेश्वर फाट्याजवळील आशादीप मंगल कार्यालयासमोर सोमवार (दि. 22) सायंकाळी पाचच्या सुमारास मालवाहू ट्रक आणि मोटारसायकल यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी जागीच ठार झाले. बाबुलाल रमेश गरुड (वय 46) व वैशाली बाबुलाल गरुड (वय 42) (मूळ रा. सटाणा, सध्या रा. नाशिक) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत.
देवळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गरुड पती-पत्नी सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मोटारसायकलने (एमएच 41 बीसी 6063) जात असताना, रामेश्वर फाट्यानजीक मालवाहू गाडीने (एमएच 18 बीझेड 2735) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीस्वार बाबुलाल गरुड यांचा अतिरक्तस्रावामुळे, तर वैशाली गरुड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच देवळा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील, पोलीस कॉन्स्टेबल दिलीप सोनवणे आणि श्रावण शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दोन्ही मृतदेह विच्छेदनासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
या घटनेप्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहेत.

Nashik couple killed in cargo truck collision

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

नारायणाच्या पोटात सुमेरसिंगाची तलवार…

- प्रशांत पोतदार ‘नारायणाच्या पोटात सुमेरसिंगाची तलवार, ’काका, मला वाचवा!’ असा झाला आक्रोश फार.’ इतिहासात…

19 hours ago

मोबाईलमुळे भविष्य संकटात

- अशोक थोरात देशात अनेक संकटे आहेत पुर्वी बाहेरगावी निरोप कसा द्यावा खुप अडचणी येत…

19 hours ago

नाठाळांच्या माथी हाणा काठी!

- देवयानी सोनार नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी जिल्हा परिषदेचा कारभार…

19 hours ago

ऐतिहासिक स्थळांवर कायमस्वरूपी पर्यटकांचा ओघ वाढावा

- मुकुंद बाविस्कर नाशिक जिल्ह्यात सिंहस्थ कुंभमेळा सन 2027 च्या पार्श्वभूमीवर सुमारे 12 कोटींहून अधिक…

19 hours ago

खड्ड्यांचे पाप कोणाचे?

- गोरख काळे नाशिकमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे मराठवाडा सुखावला असून, जायकवाडीतील पाणीपातळी सत्तर टक्क्यांपर्यंत पोहोचली…

19 hours ago

ऊर्जेची बचत, यशाची गुरुकिल्ली!

- जगन घाणेकर  वेळेचे आणि ऊर्जेचे योग्य व्यवस्थापन म्हणजेच आयुष्याचे यश! आजच्या तरुण पिढीला आयुष्यात…

20 hours ago