नाशिक :प्रतिनिधी
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला नाशिक विभागाचा निकाल 95 .90 टक्के लागला.या परीक्षेसाठी नाशिक विभागातून एकूण या परीक्षेसाठी एकूण एक लाख आठ हजार 829 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी एक लाख 96 हजार 714 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यापैकी एक लाख 88 हजार 666 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यामार्फत मार्च एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा राज्याचा निकाल 96.94 टक्के लागला आहे.कोकणाचा निकाल सर्वात् जास्त तर सर्वात् कमी निकाल नाशिक विभागाचा लागला आहे.विद्यार्थ्यांना त्यांच्या निकाल मंडळाच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.
दहावीतही मुलीच हुशार
निकालामध्ये बारावीनंतर कोकण विभागाने बाजी मारली असून दहावीतही नाशिक विभागाने मार खाल्ला आहे. नाशिक विभाग 95.90 टक्क्यांसह राज्यात तळाशी आहे. तर निकालांमध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 97.96 टक्के तर मुलांचा निकाल 96.06 टक्के लागला आहे. आकडेवारीनुसार सर्वच विभागांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे.
दहावीचा नवीन निकाल येथे पाहता येणार
WWW.maharesult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://ssc.maharesults.org.in
खा. वाजे : शिवसेना कार्यालयात मनसे पदाधिकार्यांची उपस्थिती नाशिक : प्रतिनिधी सरकारला हिंदीसक्तीचा निर्णय मागे…
धरण समूहात 47 टक्के; गंगापूर धरणात 56 टक्के पाणीसाठा नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात गेला महिनाभर…
चेन खेचल्याने वीस दिवसांत 98 गाड्यांना विलंब नाशिकरोड : प्रतिनिधी रेल्वेची विनाकारण चेन ओढण्यामुळे 1…
सध्या सुरू असलेल्या पहिलीपासूनच्या त्रिभाषा सूत्रासंदर्भात आपण सर्व मराठी बांधवांनी जाणून घ्यायला हवे आपल्या मराठी…
पारोळा : एका अनोळखी महिलेच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली होती. यानंतर महिलेचा मृतदेह…
अभोणा ग्रामपालिकेचे दुर्लक्ष, कचरा डेपोसाठी जागा नसल्याचा जावईशोध अभोणा : प्रतिनिधी देशभर स्वच्छ भारत मिशनचा…