नाशिक: प्रतिनिधी
गेल्या अनेक दिवसापासून प्रतीक्षा लागलेल्या नाशिक च्या पालकमंत्री पदावर अखेर गिरीश महाजन यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाले आहे, शासनाने आज सायंकाळी पालकमंत्री पदाची यादी जाहीर केली. पालकमंत्री पदासाठी दादा भुसे आणि गिरीश महाजन यांच्यात स्पर्धा होती, आगामी सिहस्थ लक्षात घेऊन गिरीश महाजन यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. तर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांचे नाव जाहीर केले आहे. अजित पवार यांच्याकडे पुण्याचेही पालकमंत्री पद कायम ठेवण्यात आले आहे. माणिकराव कोकाटे यांना नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री केले असून नरहरी झिरवाळ यांना हिंगोली चे प्पलकमंत्री करण्यात आले आहे.