नाशिक

नाशिकसाठी आठ टीएमसी पाण्याची आवश्यकता

जिल्हाधिकार्‍यांकडे महापालिकेची पत्राद्वारे मागणी

नाशिक : प्रतिनिधी
राज्यात यंदा अल निनोमुळे सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने राज्य शासन सावध झाले आहे. येत्या शुक्रवारपासून (दि. 16 ऑक्टोबर) राज्यात 10 टक्के पाणीकपातीचेे निर्देश दिले आहेत. दरम्यान, महापालिका प्रशासनाने नाशिककरांसाठी आणि सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आठ टीएमएसी पाण्याची मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे पत्राद्वारे केली आहे.
महापालिकेने 15 ऑक्टोबर 2026 ते 31 ऑगस्ट 2027 या कालावधीत शहरासाठी 7,370 द.ल.घ. फू. व कुंभपर्वासाठी 625 दलघफू अशी एकूण आठ टीएमसी पाण्याची मागणी केली आहे. यात 1 ते 31 ऑगस्ट 2027 या एक महिन्यासाठी 970 द.ल.घ.
फू. जादा पाण्याची मागणी नोंदवली आहे. मागील वर्षी महापालिकेने 6,400 द.ल.घ.फू. इतके आरक्षण मागितले होते. धरणात मुबलक साठा असल्याने हा पाणी आरक्षण कोटा मंजूर करण्यात आला; परंतु पुढील हंगामासाठी महापालिकेने यंदा दीड टीएमसी जादा पाण्याची मागणी केली आहे. पुढील वर्षी सिंहस्थ कुंभमेळा होणार असून, अमृतस्नान, साधुग्राम व भाविक यांच्यासाठी 625 द.ल.घ.फु जादा पाण्याची मागणी केली आहे. अल निनो संकटामुळे पुढील वर्षी पर्जन्यमान कमीच राहण्याची भीती व्यक्त केली आहे. अल निनो संकटाचा धोका पाहता धरणातील उपलब्ध जलसाठा 31 ऑगस्ट 2027 पर्यंत पुरविण्याची कसरत करावी लागेल. नाशिक महापालिकेने मागणी केलेल्या 7,300 द.ल.घ.फू. पाणी आरक्षण फेटाळल्यास व कमी पाणी मंजूर झाल्यास नाशिक महापालिकेला पाणीकपातीचा निर्णय घ्यावा लागेल. यंदा जुलै व ऑगस्टमध्ये नाशिक शहर व परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नाशिककरांची वर्षभराची पाण्याची तहान भागली. नाशिकमधील पावसामुळे जायकवाडी धरणदेखील ओव्हरफ्लो झाले होते.

पालकमंत्र्यांच्या पाणी आरक्षण बैठकीकडे लक्ष
पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. 15) बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे नाशिकचे लक्ष लागले आहे. शहरासाठी किती पाणी मंजूर करायचे यावर बैठकीतच शिक्कामोर्तब केले जाईल.

यानुसार केली मागणी
गंगापूर- 5 हजार 440 (दलघफू)
दारणा धरण- 230
मुकणे धरण- 570

महापालिकेने केलेल्या पिण्याच्या पाण्याच्या मागणीपेक्षा कमी पाणी मंजूर झाल्यास 31 ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी पुरविण्यासाठी कपात केली जाऊ शकते. पण याबाबतचा अंतिम निर्णय पालकमंत्रीच घेतील. महापालिकेने आठ टीएमसी पाण्याची मागणी केली आहे.
– रवींद्र धारणकर, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग, मनपा

Nashik requires 8 TMC of water.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

संविधान बचाव समितीचा तिरंगा मोर्चा

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी मालेगाव : प्रतिनिधी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीसह मतदार यादीच्या…

3 minutes ago

सिडकोत अतिक्रमणांवर कारवाई

तीन ट्रक विविध साहित्य जप्त सिडको : प्रतिनिधी सिडको विभागातील फुटपाथवर करण्यात आलेल्या अनधिकृत अतिक्रमणांविरोधात…

7 minutes ago

सिटी सेंटर मॉल ते विशाल पेट्रोल पंप मार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रस्त्याच्या कामामुळे वाहनचालकांची कोंडी सिडको : प्रतिनिधी शहरातील सुरू असलेली रस्त्यांची कामे आणि नवरात्रोत्सवानिमित्त रस्त्यांवर…

10 minutes ago

कांद्याच्या दरात घसरण; 13 रुपयांपर्यंत दर कमी

पहिली कांदा एक्स्प्रेस 18 ला आगरतळ्यात नवी दिल्ली : प्रतिनिधी सणासुदीच्या तोंडावर सामान्य ग्राहकांसाठी दिलासादायक…

17 minutes ago

दिल्ली पोलिसांनी तिरंगा यात्रा रोखली

अभिजित दिपके, नेहा बोरा यांना अटक ♦♦♦ सेंट्रल पार्क बंद ♦♦♦ 22 हजार जवान तैनात…

31 minutes ago

डोंगराळे बालिका अत्याचार-हत्याप्रकरणी आरोपीला फाशी

♦ मालेगाव जलदगती न्यायालयाचा निकाल ♦ पीडितेच्या वारसांना 10 लाखांची मदत ♦ अपहरण व पुरावा…

50 minutes ago