नाशिक

नाशिककरांना अद्याप दोन हजार खड्ड्यांचा त्रास !

चार हजार खड्डे बुजविल्याचा दावा; 15 जूनची डेडलाइन

नाशिक : प्रतिनिधी
महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून खड्डे बुजविण्याची कामे सहाही विभागात सुरू आहेत. आतपर्यत चार हजार खड्डे बुजवल्याचा दावा बांधकामने केला आहे. मात्र, अद्याप दोन हजार 297 खड्डे बुजविण्याचे काम सुरू असल्याचे बांधकाम विभागाने म्हटले आहे.

सहाही विभागात एकूण सहा हजार 797 खड्डे आहेत. पावसापूर्वीच शहरातील सिडको, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम विभाग, नाशिकरोड, पंचवटीसह नाशिकरोड परिसरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य झाले. त्यामुळे या रस्त्यातून प्रवास करतांना नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे अनेक ठिकाणी किरकोळ अपघाताचे प्रकारही घडले आहेत. कॉलनी रस्ते, मुख्य रस्त्यांवरील डांबरीकरण व सिमेंट रस्त्यांचेही नुकसान झाले. शहरातील खड्डे दुरुस्तीसाठी कोटयावधीची तरतूद अंदाजपत्रकात केली जाते. महापालिका दरवर्षी या तरतुदीतील निधीचा उपयोग रस्ते दुरुस्तीवर करत असते. मात्र पावसाळ्यात दर्जाहीनकामामुळे खड्यांचे साम्राज्य शहरभर दिसून येते. पावसाळ्यात डांबरीकरणाचे काम शक्य नसल्याने माती मुरूम टाकून मलमपट्टी केली जाते. परंतु काही दिवसांतच खड्ड्यातून माती, मुरुम वाहून जाऊन खड्याचा प्रश्न पुन्हा जैसे थे होत असल्याचे दिसून येते. सध्या शहरातील वेगवेगळ्या भागात रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशा मागण्या मनपाकडे येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मनपाकडून विविध भागांतील रस्ते काम सुरू करण्यात आले आहे. शहरात काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले. त्यामुळे मनपाकडे खड्ड्यांबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे.

शहरात अवकाळी पावसामुळे खड्डे पडले होते. ते तातडीने दुरुस्त केले जात आहेत. सहा विभागांतील अभियंत्यांना खड्डे बुजविण्याचे आदेश दिले असून, लवकरच सर्व खड्डे बुजविले जातील.
– संजय अग्रवाल, शहर अभियंता, मनपा

 

विभागाचे नाव         बुजविलेले खड्डे         अपूर्ण खड्डे
नाशिकरोड                          807                       239
सातपूर                                78                         533
सिडको                                1432                     1126
नाशिक पूर्व                          41                           49
नाशिक पश्चिम                   62                           74
पंचवटी                               2080                    276
एकूण                                 4500                     2297

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

4 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

4 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

4 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

4 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

4 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

4 hours ago