नाशिक

बाभूळगावच्या एसएनडी पॉलिटेक्निकला एनबीएचे मानांकन

राज्यस्तरावर नवीन ओळख; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम

येवला : प्रतिनिधी
तंत्रशिक्षण राष्ट्रीय मान्यता मंडळाने (एनबीए) मूल्यांकन करत गुणवत्तेच्या आधारे येवला तालुक्यातील बाभूळगाव येथील जगदंबा शिक्षण संस्थेच्या एसएनडी पॉलिटेक्निकला एनबीएचे मानांकन दिले आहे. यामुळे एसएनडी पॉलिटेक्निकच्या लौकिकात भर पडली आहे.
देशभरात तंत्रशिक्षण मंडळाच्या अंतर्गत सुरू असलेल्या विविध पॉलिटेक्निकमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी विविध निकषांप्रमाणे मूल्यांकन करून मानांकन दिले जाते. या मूल्यांकन प्रक्रियेमध्ये एसएनडी पॉलिटेक्निकने सहभाग घेऊन आपल्या गुणवत्तेच्या आधारावर मानांकनप्राप्त करून घेतले. यामुळे राज्यस्तरावर एसएनडी पॉलिटेक्निकची नवीन ओळख निर्माण झाली. पॉलिटेक्निकमध्ये शिक्षण घेऊन नोकरी व्यवसायाच्या निर्माण होत असलेल्या संधी, उच्च शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थिसंख्या, अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन, निकालातील प्रगती, अत्याधुनिक सुविधा, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पॉलिटेक्निकमध्ये होत असलेले विविध उपक्रम त्यामुळे प्रवेशासाठी असलेली विद्यार्थ्यांची पसंती व ग्रामीण भागातही पूर्णक्षमतेने होत असलेले प्रवेश, अशा विविध बाबींची एनबीएच्या प्रतिनिधींकडून प्रत्यक्ष गुणवत्ता तपासणी करण्यात आली. तंत्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेल्या एनबीएच्या सर्व निकषांमध्ये एसएनडी पॉलिटेक्निकचे सर्व विभाग पात्र ठरले त्यावरूनच तंत्रशिक्षण राष्ट्रीय मान्यता मंडळाकडून हे मानांकन बहाल करण्यात आले. पॉलिटेक्निकमधील कॉम्पुटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागांना एनबीएचे मानांकन प्राप्त झाले. या यशाबद्दल शिक्षक आमदार किशोर दराडे, संस्थेचे कार्यकारी संचालक रुपेश दराडे यांनी प्राचार्य उत्तम जाधव यांचा सत्कार करून सर्व विभागप्रमुख, शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

4 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

4 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

5 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

5 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

5 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

5 hours ago