खा. वाजे यांची महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकांशी चर्चा
नाशिक : प्रतिनिधी
नाशिकरोड ते द्वारका उड्डाणपुलाचे रखडलेले काम मार्गी लागणार असून, यासंदर्भात मंगळवारी (दि.17) खासदार राजाभाऊ वाजे यांनी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांची भेट घेत, याबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी हर्डीकर यांनी खासदार वाजे यांना उड्डाणपुलाला ग्रीन सिग्नल देत तांत्रिक अडचणी दूर केल्या. खासदार वाजे आणि महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्यात झालेल्या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली. येत्या सोमवारी (दि.23) नाशिक येथे महामेट्रोची विशेष बैठक होणार आहे.
नाशिकरोड ते द्वारका उड्डाणपूल, तसेच नाशिक मेट्रो यांच्याबाबत मागच्या काही वर्षांत फक्त चर्चा घडताना दिसतात. नेत्यांकडून याबाबत घोषणादेखील होतात. मात्र, कुठेही ठोस असे उत्तर नाशिककरांना मिळताना दिसत नव्हते. खासदार वाजे यांनी निवडून येताच या दोन्ही प्रकल्पांसाठी पाठपुरावा करायला सुरुवात केली. यात ठोस अशी पावलं प्रशासनाच्या वतीने उचलण्यासाठी प्रशासनाकडे तगादा लावला. याचेच पुढचे पाऊल म्हणजे महामेट्रो आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यामधील समन्वयातून हर्डीकर यांनी खासदार वाजे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत याबाबत सकारात्मकता दर्शवली असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जर उड्डाणपूल करत असेल, तर महामेट्रोसाठी जागा राखीव ठेवण्याची विनंती महामेेट्रोच्या वतीने केली जाईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सूचनेनुसार नाशिकरोड ते द्वारकादरम्यान उड्डाणपूल प्रस्तावित असताना, स्ट्रक्चर महारेलच्या दुमजली उड्डाणपुलाच्या अनुषंगाने करायचे असल्याने त्याबाबत महामेट्रोची ना हरकत याबाबत सविस्तर चर्चा झाली. नाशिकरोड ते द्वारका किंवा नाशिक मेट्रो याबाबत मागच्या काही वर्षांत फक्त घोषणा झाल्या, तसेच मागणीचे निवेदन देण्यात आले. मात्र, कुठल्याही प्रकारे ठोस पाठपुरावा किंवा कामकाज झाले नव्हते. खासदार वाजे यांनी याबाबत वस्तुनिष्ठ पाठपुरावा करून हे दोन्ही प्रकल्प नाशिकमध्ये कसे लवकरात लवकर होतील, या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत.
महामेट्रो, राष्ट्रीय प्राधिकरण, तसेच इतर अनेक अडचणींमुळे व राजकीय, प्रशासकीयअनास्थेमुळे हे दोन्ही प्रकल्प मूर्त रूप घेेत नाहीत, असे मागील वर्षभरात दिसले. त्यामुळे वस्तुनिष्ठ पाठपुरावा करून हे प्रकल्प कसे लवकरात लवकर मंजूर होतील, त्यांना निधी उपलब्ध होईल आणि खर्या अर्थाने कामाला सुरुवात होईल यासाठी युद्धपातळीवर पाठपुरावा केला जात आहे. केंद्रीय मंत्री गडकरी यांनीही मागील तीन बैठकांत नाशिकरोड ते द्वारका या उड्डाणपुलाबाबत सकारात्मकता दर्शवली आहे. आशा आहे की, पुढील काही महिन्यांतच या दोन्ही प्रकल्पांना मूर्त रूप प्राप्त होईल.
– राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक
पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…
देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…
गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…
बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…
वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…