सिडको: विशेष प्रतिनिधी
घरातील आपआपसांतील वाद पराकोटीला गेल्याने नवऱ्याने रागाच्या भरात मंगळवारी (दि.४) राहत्या घरात बायकोच्या डोक्यात कोयता व कुकरच्या झाकणाने वार करून खुन केला. गंगापुररोडवरील डी.के नगरातील स्वास्तिक निवास सोसायटीमध्ये ही घटना आज घडली.
सविता गोरे (४५) असे मृत्युमुखी पडलेल्या विवाहितेचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेनंतर पती घरातून पळून गेला होता मात्र पोलिसांनी रात्री त्यास पकडले.
गंगापुररोडवरील डी.के.नगर भागात असलेल्या स्वास्तिक निवास (बी-विंग) सोसायटीच्या चौथ्या मजल्यावरील गोरे दाम्पत्य हे मुलासह भाडेतत्वावर सदनिकेत राहत होते. मंगळवारी मुलगा हा सकाळी कामावर निघून गेल्यानंतर सविता-छत्रगुन हे पती-पत्नी घरात एकटेच होते. दुपारी पती-पत्नीमध्ये भांडण झाले. यावेळी शत्रूघन गोरे (५०) याने रागाच्या भरात बायकोच्या डोक्यात कोयता व कुकरचे झाकणाने जोरदार प्रहार केला. यामुळे सविता गोरे या रक्तबंबाळ अवस्थेत लाकडी पलंगावर कोसळल्या. यावेळी त्यांची विवाहित मुलगी फिर्यादी मुक्ता बालाजी लिखे ही त्याचवेळी घरी आल्यानंतर दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ दरवाजा वाजविल्यानंतर तिचे वडील शत्रूघनयांनी दरवाजा उघडला असता आई रक्तबंबाळ अवस्थेत बेडरूममध्ये पडलेली आढळून आली. तेथून तोपर्यंत शत्रूघन हा फरार झाला होता. मुक्ता हिने शेजाऱ्यांचे दार वाजवून मदत मागितली यावेळी रहिवाशांनी धाव घेतली. या प्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी फरार पतीस अटक केली आहे.
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…