15 Aug grup 1 नाशिक, त्र्यंबक सिंहस्थ

श्रद्धा विकास अन् अत्याधुनिक व्यवस्थापनाचा संगम

कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन

यांची विशेष मुलाखत

– देवयानी सोनार

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये पुढील वर्षात होऊ घातलेला सिंहस्थ कुंभमेळा -2027 हा केवळ धार्मिक सोहळा नसून नाशिकच्या भविष्यातील विकासाचा पाया रचणारा, महाराष्ट्राच्या प्रशासनिक क्षमतेची जागतिक पातळीवर परीक्षा घेणारा आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर उभारला जाणारा ऐतिहासिक महोत्सव ठरणार आहे. तब्बल 12 कोटी भाविकांच्या आगमनाची तयारी, 303 हून अधिक विकास प्रकल्प, सुमारे 27 हजार 960 कोटींची गुंतवणूक, अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था आणि पर्यावरणपूरक नियोजनाच्या माध्यमातून 2027 चा सिंहस्थ देशासाठी आदर्श ठरेल, असा विश्वास कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दैनिक गांवकरीला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केला.

सिंहस्थ कुंभमेळ्याकडे केवळ श्रद्धा आणि अध्यात्माचा उत्सव म्हणून पाहणे योग्य ठरणार नाही. हा महाराष्ट्राच्या प्रशासनिक क्षमता, नियोजन, आपत्ती व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यांची जागतिक कसोटी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिखर समिती आणि कुंभमेळा मंत्री समिती सातत्याने सर्व कामांचा आढावा घेत आहे.
कुंभमेळ्यासाठी सुरू असलेली विकासकामे ही केवळ 2027 च्या कुंभाच्या आयोजनापुरतीच मर्यादित नसून पुढील 25 ते 30 वर्षांतील नाशिकच्या विकासाचा भक्कम पाया याद्वारे रचला जाणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात 13 अखाड्यांचा सहभाग राहणार आहे. संपूर्ण सिंहस्थाचा कालावधी 20 महिने 3 आठवडे म्हणजेच 632 दिवसांचा असेल. मुख्य कुंभमेळा 15 जून ते 30 सप्टेंबर 2027 या 107 दिवसांच्या कालावधीत पार पडणार असून, या काळात तीन अमृतस्नान होणार आहेत. नाशिकमध्ये 44 तर त्र्यंबकेश्वरमध्ये 35 पर्वणी स्नानांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा सुमारे 12 कोटी भाविक सहभागी होतील, असा अंदाज असून, प्रत्येक अमृतस्नानाच्या कालावधीत जवळपास 2.25 कोटी भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठ्या धार्मिक व्यवस्थापनांपैकी एक म्हणून या कुंभमेळ्याकडे पाहिले जात आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने नियोजनाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढविली आहे.

Nashik, Triambak Simhastha

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *