नाशिक

नाशिक-त्र्यंबकेश्वरची वाट बिकट

खोदकाम झालेल्या रस्त्यामुळे वारकर्‍यांची कसरत

त्र्यंबकेश्वर :
त्र्यंबकेश्वर येथे सोमवारी सायंकाळपर्यंत लक्षणीय संख्येने पायी दिंड्यांनी वारकरी दाखल झाले आहेत. आज, मंगळवारी (दि.13) दशमीला येणार्‍या सर्व दिंड्या सायंकाळपर्यंत शहरात येतील. मुक्कामाच्या ठिकाणावर स्थिरावतील. पूर्वपरंपरेने येणार्‍या दिंड्या दशमीला येत असतात. मात्र, नव्याने सुरू झालेल्या दिंड्या प्रवासातील मुक्कामाच्या म्हणजेच ठेप्यांच्या सोयीनुसार एक-दोन दिवस अगोदर येतात.
वारकरी भक्त सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाने त्रस्त झाले आहेत. नाशिक- त्र्यंबकेश्वर रस्त्यावरचा प्रवास यातनादायक असल्याचे मत वारकरी व्यक्त करताना आढळत होते. रस्त्याच्या एका बाजूने दुहेरी वाहतूक सुरू आहे. पायी दिंड्यांना खोदकाम झालेल्या रस्त्याच्या बाजूने वळवण्यात आले आहे. मुरूम आणि माती याची उडालेली धूळ, तर काही ठिकाणी खडीमधून चालताना दमछाक होत आहे. मोरी आणि पुलासाठी खोदकाम झालेल्या भागात तात्पुरत्या स्वरूपात रस्ता तयार केला आहे. दिंडीसोबत असलेला रथासह वारकरी या रस्त्याचा वापर करत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम सुरू आहे. जेसीबी व पोकलेनसारखी यंत्रे, त्यासोबत वेगाने चालवण्यात येणारे ट्रॅक्टर आणि हायवा ट्रक चालताना उरात धडकी भरवत आहेत. नुकतेच त्र्यंबकेश्वर येथे हायवा गाडीखाली चिरडल्याने दोन भक्त ठार झाल्याची घटना घडलेली आहे. मात्र, रस्त्यावर वेगाने धावणारे, क्षमतेपेक्षा जास्त भरलेले ट्रॅक्टर आणि हायवा यांच्या वाहतुकीवर कोणतेही नियंत्रण असल्याचे दिसत नाही. याबाबत शासन यंत्रणा दुर्लक्ष करत आहे. यात्रा कालावधीत अशा प्रकारच्या धोकेदायक वाहतुकीवर निर्बंध घालण्याचे औचित्य दाखवण्याचे प्रशासनाला सुचलेले दिसत नाही.

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago