नाशिक

गहू-हरभर्‍याचे उद्दिष्ट पूर्ण, कांद्यामुळे मक्याचे क्षेत्र घटले

अनुदानित बियाण्याचा परिणाम; रब्बी पेरणी अंतिम टप्प्यात

मालेगाव: प्रतिनिधी
तालुक्यात रब्बी हंगामातील पिकांची लागवड अंतिम टप्प्यात पोहोचली असून, कृषी विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या अनुदानित बियाण्यामुळे गहू व हरभर्‍याची लागवड शंभर टक्के पूर्ण झाली आहे. खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे रब्बी पेरणीला महिनाभर उशीर झाला असला, तरी नोव्हेंबरअखेर शेतकर्‍यांनी वेगाने पेरणी करून नुकसान भरून काढल्याचे चित्र दिसत आहे.

यंदा तालुक्यात रब्बी हंगामासाठी 13 हजार 596 हेक्टरचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. प्रारंभी केवळ 354 हेक्टरवर पेरणी झाली होती; मात्र पावसाचे पाणी ओसरल्यानंतर पेरणीला वेग आला आणि सध्या 12 हजार 323 हेक्टरवर लागवड पूर्ण झाली आहे. गहू, हरभरा, मका व ज्वारी या चार प्रमुख पिकांनी मिळून 90.64 टक्के क्षेत्र व्यापले आहे.
कृषी उन्नती योजनेंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान राबवित गव्हाच्या ‘फुले समाधान’ वाणाचे 925 क्विंटल तर हरभर्‍याच्या ‘फुले विश्वराज’ वाणाचे 160 क्विंटल बियाणे अनुदानावर वितरित करण्यात आले. या सवलतीमुळे शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणावर बियाणे खरेदी करून लागवड केली. परिणामी गव्हाची 7 हजार 280 हेक्टर तर हरभर्‍याची 4 हजार 589 हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे.
दरम्यान, यंदा शेतकर्‍यांनी कांदा लागवडीला प्राधान्य दिल्याने मक्याचे क्षेत्र घटले आहे. मक्याच्या चार किलो बियाण्यासाठी 1300 ते 1800 रुपये खर्च येत असल्याने महागडे बियाणे परवडत नसल्याचेही कारण पुढे आले आहे. त्यामुळे सध्या मक्याची केवळ 357 हेक्टर म्हणजेच 19.8 टक्के लागवड झाली आहे. मात्र येत्या काही दिवसांत मक्याच्या क्षेत्रात 10 ते 12 टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

उद्दिष्ट पूर्ण होईल

करडई, जवस व तीळ या पिकांची लागवड शून्यावर आहे. गहू व हरभर्‍याचे उद्दिष्ट पूर्ण आहे. मक्याच्या क्षेत्रात वाढ झाल्यास रब्बी हंगामाचे लागवड उद्दिष्ट पूर्ण होईल, असा विश्वास तालुका कृषी अधिकारी भगवान गोर्डेंनी व्यक्त केला.

पीकनिहाय लागवड (हेक्टरमध्ये)
ज्वारी उद्दिष्ट   –  285 लागवड       –  277 (97.30 टक्के)
गहू उद्दिष्ट       –  7261.6 लागवड  –   7280 (100.25 टक्के)
मका उद्दिष्ट     –  1803 लागवड     – 357 (19.8 टक्के)
हरभरा उद्दिष्ट  – 4246.4 लागवड   – 4589 (108.07 टक्के)

Wheat-gram target met, maize area reduced due to onion

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

15 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

15 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

16 hours ago