सुरत परिषदेत पटकावले तिसरे स्थान
नाशिक : प्रतिनिधी
सुरत येथे स्मार्ट शहरे व स्मार्ट शहरीकरण या परिषदेचे आयोजन १८ ते २० एप्रिलदरम्यान करण्यात आले होते . भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्रालयाने सुरत स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन डेव्हलपमेंट सोबत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते . स्वातंत्र्याचा ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आझादी का अमृत महोत्सवच्या घोषणे अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . दरम्यान या कार्यक्रमात नाशिक स्मार्ट सिटीने सर्वोत्कृष्ट सहभाग शहर पुरस्करात तिसरे स्थान पटकावले . नाशिक स्मार्ट सिटी या परिषदेमध्ये नाशिक स्मार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी सीईओंच्या फ्रीडम २ वॉक अँड सायकल चॅलेंज स्पर्धेच्या राउंड २ मध्ये फ्रीडम २ वॉक श्रेणीत प्रथम क्रमांक पटकावला . यासाठी त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले . सुरत येथे आयोजित स्मार्ट शहरे , स्मार्ट शहरीकरण परिषद २०२२ मध्ये नाम्युस्मासिडेकॉलीच्या वतीने आयटीचे उपमहाव्यवस्थापक सुधीर गोराडे , प्रकल्प व्यवस्थापक निखिल भोईर , निखिल बागायतकर , साची सिंग ( वरिष्ठ सल्लागार ) यांनी सहभाग घेतला . या कार्यक्रमात शहरी परिणाम फ्रेमवर्क २०२२ चे प्रकाशन करण्यात आले . कार्यक्रमासाठी देशभरातून एक हजार हून अधिक शहर प्रतिनिधी सहभागी झाले होते . मंत्रालयाचे एकात्मिक डेटा पोर्टल , हे भारतीय शहरांबद्दल मौल्यवान डेटा प्रदान करणार असून , याचे देखील लाँचिंग करण्यात आले . स्मार्ट सिटीज मिशनने कार्यक्रमादरम्यान आउटकम आउटपुट मॅनेजमेंट फ्रेमवर्क डॅशबोर्डसह सर्वसमावेशक डॅशबोर्ड लाँच केले . स्मार्ट सिटीज स्मार्ट अर्बनायझेशन मेगा कॉन्क्लेव्हच्या सुरुवातीच्या दिवशी विविध संवादात्मक क्रिया कलापांचे प्रदर्शन , प्रख्यात वक्त्यांशी संवाद आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते .
पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…
देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…
गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…
बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…
वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…