डॉ. संजय धुर्जड.*
अस्थिरोग तज्ञ, सुदर्शन हॉस्पिटल,
नाशिक.
१२ जानेवारी खूप वैशिष्ठ्यपूर्ण दिवस आहे. भारतात हा दिवस देशातील युवकांना समर्पित केला आहे. आजचा दिवस हा “राष्ट्रीय युवक दिन” म्हणून पळाला जातो. देशाच्या एका महान सुपुत्राच्या जयंतीच्या निमित्ताने युवक दिन साजरा केला जातो. योगायोग असा की, आजच्याच दिवशी आणखी एका महान आत्म्याची जयंती असते. तो महान आत्मा म्हणजे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ शहाजी भोसले आईसाहेब. किती दुर्मिळ योग म्हणायचा, एका हिंदू बहुल राष्ट्राचे दोन निर्भीड व्यक्ती, ज्यांनी हिंदू धर्मासाठी आपले जीवन वेचले. एक हिंदू धर्मरक्षक तर दुसरा हिंदू धर्म प्रचारक. हिंदू धर्मचे रक्षण, त्याचा प्रचार आणि प्रसार करणारे हे दोन महानायक यांच्या जयंतीचे औचित्य आणि राष्ट्रीय युवक दिनानिमित्त वैचारिक चालना देण्याचा माझा हा प्रयत्न, म्हणून हा लेख.
शतकानुशतके मोगलाईच्या जुलमी शासकांच्या जमान्यात जन्मल्याने हिंदू धर्माविषयी मानसन्मान तर नाहीच नाही, अस्थाच संपलेली होती. राजेशाही सोडून बादशाही पत्कारण्याचा तो काळ. शाही दरबारी चाकरी करून वतनदारी, सुभेदारी आणि सरदारकी मिळविणे आणि आपला गुजारा करणे, हे नित्याचे झाले होते. प्रतिकार किव्हा उठाव तर काय, पण साधा विरोध दर्शवणेही कल्पने पलिकडले झाले होते. सोळाव्या शतकाच्या शेवटाला म्हणजेच १२ जानेवारी १५९८ या दिवशी सिंदखेडराजा येथे म्हाळसाबाई लखुजी व सरदार लखुजी जाधव यांच्या घरी एक कन्यारत्न जन्मास आले.
पुढे जाऊन त्यांचे शहाजी राजे भोसले यांच्याशी विवाह झाला. पिता आणि पती, दोघेही मुघली शाहींकडे चाकरी करीत होते, जे जिजाऊंना कधीच पचनी पडले नव्हते. स्थानिक रयतेच्या मालमत्तेची, आया बहिणींच्या अब्रूची आणि जीवाची होळी होताना बघून त्यांचे मन विचलित होत होते. वेळप्रसंगी पतीच्या चाकरीलाही विरोध दर्शविणारी पत्नी, आपले हिंदूंचे स्वराज्य असावे हा विचार शहाजी राजेंच्या मनात रुजवणाऱ्या जिजाऊ राणीसरकार. १९ फेब्रुवारी १६३० ला त्यांच्या पोटी जन्माला आलेल्या पुत्राला आपले स्वप्नातले स्वराज्य निर्माण करण्याचे संस्कार घालण्यास सुरवात केली. काहीही झाले तरी स्वराज्य स्थापन करायचेच असा दृढनिश्चय करणारी ती माता. आपला लेक एक आदर्श व्यक्ती, आदर्श योद्धा, आदर्श राजा, आदर्श पती व पिता व्हावा यासाठी सदैव छायेप्रमाणे त्यांच्या पाठीशी उभी राहणारी ती आई.
स्वराज्य घडवायचेच, येणाऱ्या पिढयांसाठी आपले राज्य असावे, यासाठी आपल्याच मुलाला पुढाकार घेण्यास सांगणारी ती अजब माय. आपल्या उद्देशाला प्रामाणिक रहाणे, वेळप्रसंगी सावध राहून, माघार घेऊन प्रतिहल्ला करणे, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, धोकेबाज आणि जुलमी दुश्मनांचा कोथळा काढणे, परंतु वैरी संपला की वैर संपवावे, स्वराज्याच्या आड येणाऱ्या स्वकीयांनाही माफी नाही, पर स्त्री ही मातेसमान असते, युद्धात दुश्मनांच्या माताभगिनी आणि लेकरांच्या केसालाही हात न लावणे, घोडदौड करताना रयतेच्या शेतातील पिकाच्या देठालाही धक्का लागू नये, अशा सहस्त्र आदर्श शिकवण देऊन आदर्श युवक घडविणाऱ्या त्या आदर्श मातेला तसेच हिंदू धर्माचा खऱ्या अर्थाने जीर्णोद्धार करविणाऱ्या राष्ट्रमाता, आज त्यांच्या जयंतीनिमित्त तसेच युवा दिनानिमित्त त्रिवार मानाचा मुजरा.
तद्नंतर, जवळपास तीन शतकांनंतर अर्थात १२ जानेवारी १८६३ रोजी कोलकात्यात एका बंगाली कायस्थ कुटुंबात जन्मास आलेले नरेंद्रनाथ दत्त. स्वामी रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य, योग आणि अध्यात्माचे साधक, स्वामी विवेकानंदजी युवकांचे आदर्श, तरुण, तेजस्वी, धर्म अभ्यासक, प्रचारक तथा प्रसारक, प्रखर वक्ते म्हणून ओळखले जातात. ज्यांनी हिंदू धर्म आणि त्याचे विचार सातासमुद्रापार पोहोचवत जगाच्या इतर धर्माच्या पंक्तीत हिंदू धर्माला मनाचे स्थान प्राप्त करून दिले, असे स्वामी विवेकानंद जी. सर्व धर्माचे मूळ जनक, अतिप्राचीन असा हिंदू धर्म सर्वसमावेश आहे, हे त्यांनी जगाला दाखवून दिले. आपल्या धर्माचा आणि देशाचा अभिमान बाळगणारे स्वामीजी जेव्हा युनोत भाषण करताना, “उपस्थित अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो” म्हणताच बसलेल्या मंडळींच्या काळजाला हात घातला, तिथेच त्यांनी सर्वांना जिंकले. गीता हा परमग्रंथ असून आदर्श व्यक्ती, आदर्श समाज, आदर्श देश आणि आदर्श विश्वव्यावस्था निर्माण करण्यास उपयुक्त आहे. आपण अशा धर्माचे आणि देशाचे नागरिक आहोत, जिथे जगातील सर्व जाती, धर्माचे लोक एकत्र सलोख्याने राहतात हे अभिमानाने सांगणारे स्वामी विवेकानंद.
हिंदूंची सहिष्णुता हीच खरी ताकद आहे, हे जग एक आहे आणि सर्व मानव एकसमान आहे, असा संदेश जगाला दिला. त्यांच्या भाषणांतून, लिखाणातून आणि शिकवणीतून त्यांनी नेहमी युवा वर्गाला प्रोत्साहित केले, प्रेरणा दिली. अध्यात्म आणि ध्यानाच्या आधारे तुम्हाला जे हवं आहे ते करता येऊ शकतं असे त्यांनी दाखवून दिले. पुढे त्यांनी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनची स्थापना करून आपले कार्य चालू ठेवले. १८९३ मध्ये शिकागो येथील विश्व धर्म महासभेत सनातन धर्माचे प्रतिनिधी म्हणून दिलेले भाषण विशेष प्रसिद्ध झाले. योग, राजयोग आणि ज्ञानयोग या लिखाणातून युवकांना विशेष मार्गदर्शन केलेले आहे.
अशा या आदर्श आणि प्रेरणादायी भूमीपुत्राच्या जयंतीस “राष्ट्रीय युवा दिन” घोषित करून स्वामीजींना हिंदुस्थानाचे आणि सनातन धर्माचे खरेखुरे प्रतिनिधी आहे, हे भारत सरकारने जगाला सूचित केले आहे. १९८५ पासून हा दिवस साजरा केला जातो आहे. यानिमित्त युवकांनी आपल्या मातृभूमीप्रति समर्पित व्हावे, तसेच हिंदू व सनातन धर्म आणि भारत देशाची खरी ओळख करून घ्यायची असेल तर स्वामीजींना वाचावे, त्यांचे तत्वज्ञान आणि शिकवण अंगीकारावे, ही माफक अपेक्षा करायला हरकत नाही.
घरात घुसला, अंगावर पेट्रोल टाकून पेटवले अन नंतर केले असे काही... नाशिक: …
काँग्रेस मेळावा नाशिक : प्रतिनिधी वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा…
कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अभोणा उपबाजारात शेतकर्यांंनी गुरूवारी सुमारे 700 ट्रँक्टर मधून 15 हजार…
नाशिक : प्रतिनिधी गेल्या तीन चार महिन्यांपासून हा तिकडे चालला तो तिकडे चालला अशा अफवा…
नाशिक : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पाठोपाठ मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर केला होता.आगामी स्तानिक स्वराज संस्थेच्या…
नाशिक : प्रतिनिधी वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न असला…
View Comments
This article is very inspiring for the youth. Dr dhurjad is very busy in his medical and social work as well but he tries to take out some time to give back to society. This is small try to create patriotism in the people's mind.