प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2026) त्र्यंबकेश्वर येथे 25 हजारांहून अधिक नारायण नागबली व त्रिपिंडी श्राद्ध विधी पार पडले. एका विधीचा सरासरी खर्च 10 हजार रुपये गृहीत धरल्यास अवघ्या 15 दिवसांत 25 कोटी रुपयांची विक्रमी आर्थिक उलाढाल झाली. यामुळे लॉजिंग, खानावळी, पूजेचे साहित्य, वाहने व चहा-नाश्त्याच्या व्यवसायाला मोठा हातभार लागला.
मात्र, मोठ्या प्रमाणात अर्थचक्र फिरवणार्या या कालावधीत स्थानिक प्रशासन पूर्णपणे उदासीन दिसले. ऐन गर्दीच्या काळात एसटी बसची कमतरता, वीज-पाणीपुरवठा खंडित असणे, उकरलेले रस्ते आणि भटक्या कुत्र्यांचा त्रास यामुळे भाविकांचे अतोनात हाल झाले. त्यातच सिंहस्थ कामांसाठी मुख्य कुशावर्त घाट बंद ठेवल्याने लांबून आलेल्या भाविकांचा मोठा हिरमोड झाला. तसेच पिंडदान ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत टाकावे लागल्याने अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. धार्मिक पर्यटनातून शासनाला मोठा महसूल मिळतो; परंतु मूलभूत सुविधांचा अभाव आणि होणारी ससेहोलपट यामुळे संतप्त भाविक पुन्हा न येण्याचा विचार करत आहेत. पुढे नारायण नागबली धर्मशाळा व सतीचे स्मशान स्थलांतरित होणार असल्याने, प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही तर भविष्यात भाविकांचा ओघ कमी होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
Navratri festival should be celebrated in accordance with customs and traditions!
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…
कामे वेळेत पूर्ण करण्यावर पालकमंत्री गिरीश महाजन यांचा भर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या…