महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते. नऊ दिवसांत नऊ प्रकारच्या पानांची आणि फुलांची माळ घटावर सोडली जाते. घरात अखंड नंदादीप तेवत ठेवला जातो. काही ठिकाणी त्रिकालपूजन केले जाते. सुवासिनी नवरात्रीच्या दिवसांत सप्तशती ग्रंथाच्या पाठाचे वाचन करतात. कुमारिकांचे पूजन करून त्यांना भोजन दिले जाते. नऊ दिवस एकभोजनी किंवा निराहार उपवास केला जातो.
रात्री देवीचा जागर केला जातो. ललिता पंचमी, महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे), अष्टमीचे होमहवन, सरस्वती आवाहन-पूजन अशा प्रकारचे धार्मिक विधी नवरात्राच्या निमित्ताने केले जातात. काही ठिकाणी भोंडल्याचे आयोजन केले जाते. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या या प्रथा आता काही भागांपुरत्या मर्यादित राहिल्या आहेत. शहरासारख्या ठिकाणी आता नवरात्राचाही इव्हेंट होऊ लागला आहे. मातीच्या पार्थिव मूर्तीची स्थापना ही केवळ गणेश चतुर्थीला करण्याचे शास्त्रवचन आहे. हल्ली नवरात्राच्या निमित्ताने ठिकठिकाणी देवीच्या मूर्ती आणून त्यांची मंडपात प्रतिष्ठापना केली जाऊ लागली आहे, ज्याला शास्त्राधार नाही. मुंबईसारख्या ठिकाणी गणपतीप्रमाणे देवीच्याही उंच मूर्ती आणल्या जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे मुंबईत उंच गणेशमूतीर्र् पाहण्यासाठी भाविकांची आणि पर्यटकांची जशी गर्दी होते तशी पुढील काही वर्षांत नवरात्रातही होऊ लागल्यास आश्चर्य वाटायला नको. बॅलन्सिंग बाप्पाचा ट्रेंड मुंबईत लोकप्रिय झाल्यानंतर यंदा नवरात्रातही त्याची झलक दिसून येत आहे. अनेक नवरात्रोत्सव मंडळांनी यंदा आपल्या मंडळांत देवीच्या बॅलन्सिंग मूतीर्र् स्थापन केल्याचे पाहायला मिळते आहे. अनंत चतुर्दशीला जशा उंच गणेशमूर्ती समुद्रकिनारी छिन्नविछिन्न अवस्थेत पाहाव्या लागल्या तशा आता देवीच्या मूर्तीही दुर्दैवाने पाहायला मिळतील. बॅलन्सिंग बाप्पाच्या मूर्तींची समुद्रकिनारी कशी अवहेलना होते हे यंदा रील्सच्या माध्यमातून सर्वांनीच पाहिले. दसर्याच्या दुसर्या दिवशी देवीच्या मूर्तीही त्याच स्थितीत पाहायला मिळतील.
देवतांचे उत्सव हे मनोरंजनाचे माध्यम नाहीत आणि देवतांच्या मूर्ती या शोभेच्या वस्तू नाहीत, याची समज उत्सव साजरा करणार्या मंडळांना केव्हा येणार आहे? विसर्जनाच्या दुसर्या दिवशी समुद्रकिनार्यावरील दृश्य पाहिल्यावर कोणत्याही भाविकांच्या डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहत नाही.
हिंदू धर्मातील सण-उत्सव हे देवतांच्या उपासनेचे पर्व असते. त्या दिवसांत त्या देवतेची मनोभावे आराधना केल्यास इच्छित फळ लाभते. मात्र, विसर्जनाच्या वेळी देवतेच्या मूर्तीची विटंबना झाल्यास त्यास उत्तरदायी असणार्यास त्याचे पातकही लागते. त्यामुळे नवरात्रात सुरू झालेल्या या घातक ट्रेंडला वाढण्यापासून थांबवूया आणि पूर्वापार चालत आलेल्या प्रथा- परंपरेनुसार नवरात्रोत्सव साजरा करूया!
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…
कामे वेळेत पूर्ण करण्यावर पालकमंत्री गिरीश महाजन यांचा भर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या…